भारताची लढाऊ विमाने पाकीस्तानमध्ये घुसली (फोटो- इंडियन एअर फोर्स )
नवी दिल्ली: पाकिस्तानकडून भारतावर हल्ले सुरूच आहेत. शुक्रवारी रात्री देखील भारताच्या अनेक शहरांना पाकिस्तानने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताने सर्व हल्ले परतवून लावले आहेत. पाकिस्तान भारतावर ड्रोन हल्ले केले. मात्र भारताने ते हवेतल्या हवेत उधळून लावले आहेत. यानंतर मात्र भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. भारताची लढाऊ विमाने पाकिस्तानमध्ये घुसली आहेत.
भारताची लढाऊ विमाने पाकिस्तानमध्ये घुसली आहेत. पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. भारताने पाकिस्तानच्या तीन ते चार हवाई तळांवर हल्ले केले आहेत. भारताने रावळपिंडीजवळ असलेल्या नूर खान हवाई तळावर हल्ला केला आहे, असे म्हटले जात आहे. मुरीद आणि सुकुर या हवाई तळांवर देखील भारताने हल्ला केल्याचे म्हटले जात आहे.
भारताच्या या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. भारताच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानचे तीन एअरबेस उडवले आहेत. त्यामुळए पाकिस्तानी एअरफोर्स या ठिकाणावरून उड्डाण करून शकणार नाही. पाकिस्तानचे या हल्ल्यात मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानकडून भारताचे हवाई तळ लक्ष्य करण्यात आले होते. मात्र भारताने हा हल्ला परतवून लावला.
उधमपुर आणि पठाणकोट एअरबेसवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तान लढाऊ विमाने भारताच्या हद्दीत शिरली होती. मात्र भारताने हे हल्ले उधळून लावले आहेत. मात्र पाकिस्तानची मिसाईल्स भारताने हवेतल्या हवेतच नष्ट केली आहेत. सिरसा हवाई बेसला देखील पाकिस्तानने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता.
26 ठिकाणी भारताकडून पाकचे हल्ले निष्प्रभ
पाकिस्तानकडून भारतातील 26 ठिकाणी हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतीय लष्कराची महत्वाची ठिकाणी आणि नागरिक वस्ती यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जम्मू-काश्मीर, पंजाब, गुजरात राज्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र भारताने हल्ला परतवून लावला.
भारतीय लष्कराने पाकिस्तानचा ड्रोन हल्ला परतवून लावला. पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यात काही नागरिक जखमी झाले आहेत. सुरक्षा दल परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसेच पाकिस्तानला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. सीमेवर हायअलर्ट देण्यात आला आहे. दिल्लीत महत्वाच्या बैठका सुरू आहेत.
India Vs Pakistan War Live: श्रीनगर ते गुजरात अन्…; 26 ठिकाणी भारताकडून पाकचे हल्ले निष्प्रभ
पठाणकोट एअरबेसवर पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न
पाकिस्तानकडून सीमेवर जोरदार गोळीबार सुरू आहे. त्यासोबतच पंजाब, राजस्थान, गुजरातमध्ये ड्रोन हल्ले करण्याचे प्रयत्न केला आहे. मात्र भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले आहेत. सध्या भारतीय सुरक्षा दले अलर्ट मोडवर आहेत. पठाणकोट एअरबेस सुरक्षित आहे. तसेच ड्रोन हल्ल्यात भारताचे कोणतेही नुकसान झाले नाही अशी माहिती समोर येत आहे.