भारतीय लष्कराची ताकद वाढणार! DRDO कडून अत्याधुनिक 'आर्मर्ड व्हीकल' सज्ज (Photo Credit- X)
‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या या आर्मर्ड व्हीकलची सर्वात मोठी ओळख म्हणजे याची प्रगत मारक क्षमता. या वाहनामध्ये ३० मिमीचे ‘क्रूलेस बुर्ज’ बसवण्यात आले आहे, जे ७.६२ मिमी पीकेटी गनशी जोडलेले आहे. विशेष म्हणजे, हे वाहन अँटी-टँक गाईडेड मिसाइल (ATGM) डागण्यासही पूर्णपणे सक्षम आहे. यामुळे युद्धाच्या मैदानात शत्रूच्या टँकचा खात्मा करणे भारतीय सैन्यासाठी अधिक सोपे होणार आहे.
𝐀𝐡𝐢𝐥𝐲𝐚𝐧𝐚𝐠𝐚𝐫, 𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚 | 𝐃𝐑𝐃𝐎’𝐬 𝐀𝐝𝐯𝐚𝐧𝐜𝐞𝐝 𝐀𝐫𝐦𝐨𝐮𝐫𝐞𝐝 𝐩𝐥𝐚𝐭𝐟𝐨𝐫𝐦 𝐟𝐥𝐚𝐠 𝐨𝐟𝐟 𝐜𝐞𝐫𝐞𝐦𝐨𝐧𝐲 DRDO Chairman, Samir V Kamat, flags off the Advanced Armoured Platform (tracked and wheeled) Vikram VT-21, marking the induction of… pic.twitter.com/vv8fTAeptM — All India Radio News (@airnewsalerts) April 25, 2026
या वाहनाचे इंजिन आणि ट्रान्समिशन अत्यंत शक्तिशाली आहे, ज्यामुळे ते कोणत्याही आव्हानात्मक भूप्रदेशावर सहज धावू शकते.
“संरक्षण प्रकल्पांसाठी ‘अवास्तव निविदा’ टाळा; DRDO अध्यक्ष डॉ. समीर कामत यांच्या सूचना
या प्रकल्पाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे स्वदेशीकरण. सध्या या वाहनामध्ये ७० टक्क्यांहून अधिक भारतीय सुटे भाग वापरण्यात आले आहेत. डीआरडीओचे लक्ष्य हे वाहन लवकरच १०० टक्के ‘मेड इन इंडिया’ करण्याचे आहे. याच्या निर्मितीमध्ये टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड आणि भारत फोर्ज लिमिटेड यांसारख्या दिग्गज कंपन्यांसह अनेक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी (MSME) मोठे योगदान दिले आहे.
मेजर जनरल एस. के. सिंग यांच्या मते, हे आर्मर्ड व्हीकल संरक्षण क्षेत्रातील स्वदेशीकरणाला एका नवीन उंचीवर घेऊन जाईल. हे वाहन केवळ लष्कराला सामर्थ्य देणार नाही, तर युद्धभूमीवर सैनिकांना बॅलिस्टिक आणि स्फोटक हल्ल्यांपासून अभेद्य सुरक्षा कवचही प्रदान करेल. लष्करी गरजांनुसार या वाहनात विविध बदल करणे शक्य असल्याने ते अत्यंत बहुआयामी ठरले आहे.






