आमदार संजय गायकवाड यांनी कोल्हापुरातील प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी पोलीस ठाण्यातचं जोरदार घोषणाबाजी तर बाहेर शिवाजी कोण होता? पुस्तकाचे वाचन आमदार संजय गायकवाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची देखील प्रशांत आंबी यांच्या पत्नीची मागणी दीड तासाच्या ठिय्या आंदोलनांतर गुन्हा दाखल करण्याचं पोलिसांचं आश्वासन संजय गायकवाड यांनी व्यक्त केलेली दिलगिरी मला मान्य नाही..! कठोर कारवाई होईपर्यंत लढा सुरू ठेवणार : प्रकाशक प्रशांत आंबी बुलढाणा येथील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी दोन दिवसापूर्वी शिवाजी कोण होता? या कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचे कोल्हापुरातील प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिलीये..मात्र संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस टाळाटाळ करत असल्याने शुक्रवारी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि आंबी कुटुंबीयांसह शेकडो कार्यकर्ते आक्रमक झालेतं.. रोहित पवारांनी कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात सुमारे दीड तास कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडला..यावेळी रोहित पवार यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली..तर कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यातचं घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला..त्यामुळे यावेळी जोरदार राडा पहायला मिळाला..त्याचवेळी राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या बाहेर डाव्या आघाडीतील कार्यकर्त्यांनी शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे जाहीर वाचन सुरू केलं..तर संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही पोलीस ठाणे सोडणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली..त्यामुळे अखेर पोलिसांनी नरमाईची भूमिका घेत तब्बल दीड तासांनी गुन्हा दाखल करतो असं आश्वासन दिलं..दरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी ती आम्हाला मान्य नाही त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली..तर संजय गायकवाड यांनी व्यक्त केलेली दिलगिरी मला मान्य नसून त्यांच्यावर कठोर कारवाई होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याची भूमिका प्रकाशक प्रशांत आंबी यांनी व्यक्त केली. .