दोन सेकंदाचा आनंद अन्...! लग्नात 'ग्रॅंड एन्ट्री' जीवावर बेतली; फायरगनमुळे नवरदेवासोबत 'असं' काही घडलं, VIDEO पाहून उडेल थरकाप (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भर रस्त्यात नाचक्की! पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोर ‘असा’ झाला पसार, VIDEO पाहून पोट धरुन हसाल
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नाचा मोठा सोहळा उत्साहात सुरु आहे. नवरा-नवरी दोघेही लग्नाच्या वेशभूषेत लग्न मंडपात एन्ट्री घेतात. या एन्ट्रीला शानदार बनवण्यासाठी नवरा-नवरीच्या हतात फायर गन देण्यात येते. जसे जोडपे स्टेजच्या दिशेने येऊ लागते तसेच एकाच वेळी दोघेही फायर गन चालवतात. सुरुवातील सर्व काही सुरळित असते. परंतु काही सेकंदाचा आनंद क्षणात धोक्यात बदलतो. फायगनमधून ठिणग्या उडून अचानक नवरदेवाच्या तोंडावर आणि डोक्यावर उडू लगतात. यातील एक ठिणगी नवरदेवाच्या कानात उडते. यामुळे नवरदेवाला असह्य त्रास जाणवतो. धक्कादायक बाब म्हणजे, यावेळी नवरी आपली फायर गन चालवण्यात दंग असते. नवरदेवाला काय झालं याचे तिला भान नसते.
व्हायरल व्हिडिओ
Twlling u guys again: Should ban these Stupidity in Marriages pic.twitter.com/zzfSg2zVI7 — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 23, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले आणि संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने दिखाव्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणे कितपत योग्य आहे असा प्रश्न केला आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने लग्नासारख्या आनंदाच्या क्षणात स्टंटबाजीमुळे अनर्थ घडू शकतो असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एकाने नवरीच्या वागणूकीवर प्रश्न उपस्थित केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






