भारत-पाकिस्तान तणावादरम्यान केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय (फोटो - istockphoto)
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. सीमेवर पाकिस्तान भारतावर हल्ले करत आहे. भारतीय सुरक्षा दले हे हल्ले परतवून लावत आहेत. मात्र पाकिस्तान काही सुधरण्याचे नाव घेत नाहीये. भारताच्या महत्वाच्या शहरांवर आणि एअरबेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता या पार्श्वभूमीवर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. या दृष्टीने नागरिकांचे आणि सीमेचे संरक्षण करणे सरकारचे कर्तव्य आहे. त्या दृष्टीने सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने देशातील काही विमानतळे बवन्द ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही विमानतळे नागरिकांसाठी बंद करण्यात आली आहे.
श्रीनगर, चंदीगड आणि उत्तरेकडील अनेक एअरपोर्ट बंद करण्यात आली आहेत. अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. भारत सरकारने तब्बल 32 एअरपोर्टस बंद ठेवण्याच्या निर्णय घेतला आहे. नागरिकांसाठी ही एअरपोर्टस बंद करण्यात आली आहेत. भारत सरकारने श्रीनगर, अमृतसर, चंदीगड, लेह, जोधपुरम, भूज, जामनगर आणि राजकोट या एअरपोर्टवरून उड्डाणे 15 मे पर्यन्त रद्द करण्यात आली आहेत.
दरम्यान, य 5 मे पर्यन्त जे एअरपोर्टस बंद राहणार आहेत. त्या काळात जितकी फ्लाइट्स रद्द होतील त्याचे पैसे प्रवाशांना परत दिलए जाण्याची शक्यता आहे. हलवारा, हिंडन, जम्मू, जैसलमेर, जामनगर, आदमपूर, अंबाला, अमृतसर, अवंतीपूर, भटिंडा, भुज, बिकानेर, चंदीगड, जोधपूर, कांडला, कांगडा (गग्गल), केशोद, किशनगड, कुल्लू मनाली म्हणजे भुंतर आणि लेह. लुधियाना, सारसावा, शिमला, श्रीनगर, मुंद्रा, नालिया, पठाणकोट, पटियाला, पोरबंदर, राजकोट ही एअरपोर्ट बंद राहणार आहेत.
पाकिस्तानातील सियालकोटचा लष्करी तळ उद्ध्वस्त
सोफिया कुरेशी म्हणाल्या की, पाकिस्तानकडून चिथावणीखोर कारवाया होत आहेत. तर भारताने त्यांच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले. आज पहाटे झालेल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानने जड शस्त्रांचा वापर केला. पाकिस्तानने क्षेपणास्त्राने हल्ला केला. पाकिस्तानने नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून केला. कर्नल सोफिया म्हणाल्या की, पाकिस्तानचा दृष्टिकोन बेजबाबदार आहे.
India-Pakistan Conflict: जशास तसे! पाकिस्तानातील सियालकोटचा लष्करी तळ उद्ध्वस्त- सोफिया कुरेशी
आंतरराष्ट्रीय सीमा आणि श्रीनगर पासून नलियापर्यंत २६ हून अधिक ठिकाणांवर हल्ले करण्यात आले पण भारतीय लष्कराने हे हल्ले हाणून पाडले. तरीही वायुसेनेच्या तळावर सियालकोट उधमपूर, पठाणकोट, आदमपूर, भूज, भटिंडा स्टेशन या ठिकाणी भारतीय लष्करानेही हल्ले केले. पाकिस्तानने १.४० मिनिटांनी हायस्पीड मिसाईलचा वापर करून पंजाबचे हवाईस्थळाला लक्ष्य कऱण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, उधमपुर येथील रुग्णालये आणि शाळांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे नागरी स्थळांना लक्ष्य कऱण्याचा पाकिस्तानचा हेतू उघड झाला. पण त्यावरही भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर देत त्यांचे हल्ले परतून लावले.