नवी दिल्ली: अलीकडे भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणावाचे वातावरण स्पष्टपणे दिसून येत आले. विशेष करुन पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईने तणावा प्रचंड वाढ झाली आहे. भारताच्या वॉटर स्ट्राईकने पाकिस्तानची आधी घबराट उडालेली आहे. याच दरम्यान संभाव्य लष्करी हल्ल्याचीही भीती पाकिस्तानला सतावत आहे. याच दरम्यान आणखी एक महत्वाची घटना समोर आली आहे.
अरबी समुद्रात भारताच्या हालचालीने जगाचे लक्ष वेधले आहे. भारतीय नौदलाचे अत्याधुनिक P-8I विमान अरबी समुद्रात उडताना दिसले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी नौदलाच्या सरावापासून अगदी जवळ हे विमान उडताना दिसले आहे. यामुळे सध्या भारताची ही हालचाल चर्चेचा विषय बनली आहे.
भारताचे P-8I विमान हे समुद्री सुरक्षेतील एक महत्वाची ताकद आहे. अमेरिकेच्या बोईंग कंपनीने तयार केलेले हे विमान आहे. या विमानाला उडती नजर म्हणून ओळखले जाते. हे अत्याधुनिक विमान शत्रूंच्या पाणबुड्यांच्या हालचालींपासून ते जहाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सक्षम आहे. भारताच्या या ताकदीला पाकिस्तानच्या नौदल सरावाच्या अगदी जवळ उडाताना पाहण्यात आले असल्याचे फ्लाइट ट्रॅकिंग संकेतस्थाने माहिती दिली आहे. यामुळे भारताचे सर्वेलन्स आर्क म्हणजेच पाळत ठेवण्याचे क्षेत्र किती मजबूत आहे हे यावरुन स्पष्ट होते.
याशिवय भारत सध्या नौदल आणि हवाई दलाच्या संयुक्त मोहिमा राबवत आहे. भारताने समुद्रातील शत्रूंच्या हालचालींवर कटाक्ष नजर ठेवली आहे. नुकतेच भारतीय नौदलाने आणि DRDO ने एकत्र येऊन स्वदेशी मल्टी-इंफ्लुएंस ग्राऊंड माईनची यशस्वी चाचणी केली आहे. ही स्फोटके शत्रूच्या जहाजांना लक्ष्य करण्यास सक्षम आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही चाचणी घेण्यात आली. भारताच्या या हालचालींनी पाकिस्तानची घाबरगुंडी उडालेली आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नौदलाचे, वायुदलाचे प्रमुख आणि संरक्षण सचिव यांची पंतप्रदान मोदी यांच्यासह बैठक झाली. या बैठकीत सागरी सुरक्षेची सरकारकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली.
सध्या भारत केवळ बचावात्मक दृष्टीने नव्हे तर प्रत्येक संभाव्य हल्ल्याला ठोस प्रतिसाद देण्यासाठी सुसज्ज होत आहे. अरबी समुद्रातील भारताच्या उडती नजर चे दर्शन ही भारताची सागरी हद्दीत आणि संरक्षण व्यवस्थेतील सतर्कतेचे उदाहरण आहे. भारताच्या या लष्करी हालचालींमुळे पाकिस्तानची बोबडी वळली आहे. भारताच्या या हालचाली जागतिक स्तरावर ताकदीचा एक संदेश आहेत. दरम्यान आता भारत-पाकिस्तान तणाव काय वळण घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.