मंगळुरू : कर्नाटकातील (Karnataka) मंगळुरुमध्ये एक भयानक प्रकार घडला आहे. एक तरुण आणि त्याची गर्लफ्रेंड यांच्यातील व्हॉट्स ॲप चॅटमुळे (Whats App Chat) मुंबईला (Mumbai) येणाऱ्या विमानाला (Indigo Flight Delayed) तब्बल सहा तास उशीर झाला. या विमानातील सर्व प्रवाशांना विमानातून उतरवून स्फोटकं आहेत का याची तपासणी करण्यात आली.
[read_also content=”मुकेश अंबानींना जिवे मारण्याची धमकी, दहिसरमधून ५७ वर्षीय संशयित ताब्यात https://www.navarashtra.com/india/threat-call-to-mukesh-ambani-on-reliance-foundation-hospital-number-mumbai-police-investigating-case-316247.html”]
रविवारी इंडिगो एअरलाईन्सचं विमान मंगळुरुहून मुंबईच्या दिशेने जाणार होतं. सर्व प्रवासी विमानात बसले होते. दरम्यान एका तरुणाच्या शेजारच्या सीटवर बसलेल्या महिला प्रवाशाने व्हॉट्स ॲप चॅट पाहिलं. हा तरुण त्याच्या गर्लफ्रेंडसोबत चॅट करत होता. त्या दोघांमधील चॅट संशयास्पद वाटल्याने महिला प्रवाशाने याची माहिती क्रू मेंबर्सना दिली. क्रूने एअर ट्रॅफिक कंट्रोलरला माहिती दिली. त्यानंतर उड्डाणासाठी तयार असलेलं विमान पुन्हा माघारी पाठवलं.
संबंधित तरुण त्याच्या गर्लफ्रेंडसोबत व्हॉट्स ॲपवर चॅट करत होता. गर्लफ्रेंड त्याच विमानतळावरुन बंगळुरुला जाणारं विमान पकडणार होती. दोघे आपापसात सुरक्षेवरुन विनोद करत होते. याचवेळी १४बी सीटवर बसलेल्या महिला प्रवाशाने १३ ए सीटवरील तरुणाच्या मोबाईल फोनवरचा मेसेज बघितला. या मेसेजमध्ये ‘यू ऑर बॉम्बर’, असं लिहिलं होतं. त्यानंतर या संशयास्पद मेसेजची माहिती क्रू मेंबर्सना देण्यासाठी महिला जागेवरुन उठली. यानंतर विमानाचं उड्डाण रोखण्यात आलं. क्रूने एअर ट्रॅफिक कंट्रोलरला याची माहिती दिली. संबंधित तरुणाची चौकशी करण्यासाठी त्याला विमानातून बसून उड्डाण करु दिलं नाही. त्याच्या गर्लफ्रेंडची देखील चौकशी करण्यात आली. तिलाही थांबवण्यात आलं. सगळी तपासणी आणि चौकशी झाल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता विमानाने उड्डाण केलं.