इस्त्रायल लेबनॉन ताब्यात घेणार (फोटो- istockphoto)
मिडल ईस्टमधील युद्धाची अनेक देशांना झळ
इस्रायलचे लष्कराला लेबनॉन ताब्यात घेण्याचे आदेश
इराणवर हल्ल्याचे प्रमाण वाढले
मिडल ईस्टमध्ये अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर जोरदार हल्ले केले आहेत. त्यात इराणचे प्रमुख नेते ठार झाले. इराणने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मिडल ईस्टच्या युद्धाचा आज चौथा दिवस आहे. आता या युद्धाचे परिणाम जगभरात जाणवू लागले आहेत. तर दुसरीकडे इस्त्रायलने लेबनॉनच्या सीमा ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तणाव वाढला आहे.
यासंदर्भात पाकिस्तानचे संरक्षणमंत्री यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ख्वाजा आसिफ यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून इस्त्रायल आणि जाय =निस्ट विचारधारेवर जोरदार टीका केली आहे. आसिफ म्हणाले, ‘ मुस्लिम जगतात जितकी अस्थिरता आहे तेवढ्याचे कारण जायनिस्ट म्हणजेच इस्त्रायल आहे. इराणने चर्चा करून संघर्ष सोडवण्याची तयारी दाखवली होती मात्र इस्त्रायल आणि अमेरिकेने हे युद्ध सुरू केले.
Iran Israel War: अमेरिकेवर अणुबॉम्ब पडणार? इराणमध्ये आलेला भूकंप नैसर्गिक की…? विनाश निश्चित
युद्धात किती जणांचा मृत्यू
मिडल ईस्टमध्ये जे युद्ध सुरू आहे त्या ठिकाणी भयावह स्थिती आहे. इराणमध्ये इस्त्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे आतापर्यंत 742 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वात दु:खद म्हणजे यामध्ये 176 लहान मुलांचा समावेश आहे, 750 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत.
युद्धाचे सावट आता लेबनॉनपर्यंत पोहोचले आहे. लेबनॉनच्या सीमावर्ती भाग ताब्यात घेण्याचे आदेश इस्त्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी दिले आहेत. हे पाऊल हिजबुल्लाहकडून होणारे हल्ले रोखण्यासाठी उचलण्यात आले आहे. इस्त्रायलने लेबनॉनच्या मुसक्या मोठ्या प्रमाणात आवळल्या आहेत.
ब्रम्होसपेक्षाही भयंकर इराणचे ‘हे’ ब्रम्हास्त्र, इस्त्रायलचा होऊ शकतो नायनाट; 20000 Kmph आहे वेग
अमेरिकेवर अणुबॉम्ब पडणार?
इराणवर येणारी संकटे थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाहीयेत. आधीच अमेरिका आणि इस्त्रायल इराणवर भीषण हल्ले करत असतानाच आता इराणवर नैसर्गिक संकट असल्याचे समोर आले आहे. इराणमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. इराणच्या गेराश भागात 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे समोर येत आहे. हा भूकंप नैसर्गिक नसून त्याच्या अणूकार्यक्रमाशी सबंधित असल्याचे म्हटले जात आहे.
इराणमध्ये झालेल्या भूकंपामुळे आधीच तणाव असलेल्या देशात राजकीय आणि लष्करी अनिश्चितता वाढली आहे. भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाले नसल्याने तेथील नेतृत्वाला दिलासा मिळाला आहे. अचानक झालेल्या भूकंपामुळे तेथील नागरिक भयभीत झाले आहेत. इराणमध्ये आलेला भूकंप हा त्याच्या अणूकार्यक्रमाशी सबंधित असल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भातील अफवा सोशल मिडियावर वेगाने पसरत आहेत. इराणच्या अणूकार्यक्रमाच्या ठिकाणी हल्ले होत असल्याचे समोर येत आहे. मात्र तज्ञांनी या गोष्टीचे खंडन केले आहे.






