जम्मू काश्मीरमध्ये स्फोट (फोटो- सोशल मिडिया)
जम्मू काश्मीरमध्ये सीमारेषेजवळ स्फोट
एक अग्नीवीर जवान जखमी
एलओसी परिसरात मोठा बंदोबस्त
श्रीनगर: जम्मू काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पूंछ जिल्ह्यात एक मोठी घटना घडली आहे. एलओसीजवळ लँड माइनचा स्फोट झाला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी एलओसीजवळ गस्त घालत असणारा एक अग्नीवीर जवान या स्फोटात जखमी झाल्याचे समोर येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, एक जवान एलओसीजवळ गस्त घालत होता. तेव्हा अचानक जवानाचा पाय लँड माइनवर पडला. त्यावर पाय पडताच मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकताच गस्त घालणारे सैनिक आणि अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले. जखमी झालेल्या जवानाला तत्काळ तिथून हलवण्यात आले.
बातमी अपडेट होत आहे…






