सौजन्य - सोशल मिडीया
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगी घराशेजारी खेळण्यासाठी गेली होती. खेळून झाल्यानंतर ती आपल्या घरी परतत असताना वाटेत दबा धरून बसलेल्या आरोपी रोहिदास वाकचौरे याने तिला आवाज देऊन बोलावून घेतले. त्यानंतर तिला फूस लावून स्वतःच्या घरात नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार तसेच अप्राकृतिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला.
हे सुद्धा वाचा : स्वरा उपाध्ये हत्या प्रकरणात मोठी अपडेट; ४८ तासांनंतर संशयित कर्नाटकातून ताब्यात
नातेवाइकांची पोलिसांत धाव
घटनेनंतर पीडित मुलीने घरी येऊन घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी तत्काळ रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी रोहिदास वाकचौरे याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पोक्सो) तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (अॅट्रॉसिटी) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक केली. अल्पवयीन मुलीवरील लैंगिक गुन्ह्यांचे प्रकरण असल्याने पोलीस सर्व कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन करत फॉरेन्सिक व इतर पुरावे गोळा करत आहेत. या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले आणि महिला पोलीस उपनिरीक्षक सविता काळे करत आहेत.
Ans: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे हा संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
Ans: रोहिदास दत्तात्रय वाकचौरे (वय ६५ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
Ans: या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.






