'इंदिरा गांधींप्रमाणे ममता बॅनर्जींनाही गोळ्या घाला,' तरुणीची इन्स्टावर पोस्ट व्हायरल
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात वादग्रस् पोस्ट टाकल्याप्रकरणी एका तरुणीला अटक करण्यात आली आहे. इंस्टाग्रामवर युजर्सला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हत्येसाठी लोकांना प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण अशावेळी समोर आले आहे, जेव्हा बंगालसह देशातील अनेक राज्यांमध्ये आरजी कार हॉस्पिटलमधील डॉक्टरांवर झालेल्या अत्याचाराविरोधात निदर्शने सुरू आहेत.
इन्स्टावर व्हायरल पोस्ट करणाऱ्या तरुणीचे कीर्ती शर्मा असे नाव आहे. ती इंस्टाग्रामवर ‘किर्तीसोशल’ हे हँडल चालवते. अहवालानुसार, या तरुणीवर देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींसारख्या मुख्यमंत्र्यांच्या हत्येसाठी लोकांना भडकवल्याचा आरोप आहे. तरुणीने इन्स्टावर एक पोस्ट केली असून त्यामध्ये तिने म्हटलं की, ‘इंदिरा गांधींप्रमाणे ममता बॅनर्जींना गोळ्या घाला. जर तुम्ही ते करू शकत नसाल तर मी तुम्हाला निराश करणार नाही.
हे सुद्धा वाचा: गुप्तांगावर जखमा, फुफ्फुसात रक्तस्राव…! कोलकाता महिला डॉक्टरसोबत काय झाले? पोस्टमॉर्टमचा धक्कादायक रिपोर्ट समोर
मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाता पोलिसांनी यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. ‘किर्तीसोशल नावाच्या इंस्टाग्राम आयडीवर आरोपींबाबत तक्रार आली आहे. युजर्सने अलीकडेच आरजी कार हॉस्पिटलशी संबंधित घटनेबाबत तीन इंस्टाग्राम स्टोरीज अपलोड केल्या होत्या. पोस्टमध्ये पीडितेचा फोटो आणि ओळख समाविष्ट आहे, जी अत्यंत आक्षेपार्ह आहे.’यासोबतच आरोपीने आणखी दोन बातम्या शेअर केल्या आहेत, ज्यात त्याने पश्चिम बंगालच्या माननीय मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या टिप्पण्या प्रक्षोभक आहेत आणि सामाजिक अशांतता निर्माण करू शकतात आणि समुदायांमध्ये द्वेष वाढवू शकतात.