"I would rather die than go and ask something for myself": Shivraj Singh Chouhan
भोपाळ: मध्य प्रदेशचे(Madhya Pradesh) मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी एक अजब सल्ला दिला आहे. डॉक्टरांकडून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधाच्या चिठ्ठीवर हिंदीमध्ये (Prescription In Hindi) मजकूर लिहावा असं त्यांनी भोपाळमधील (Bhopal) एका कार्यक्रमामध्ये म्हटलं आहे. मात्र हा सल्ला देताना त्यांनी डॉक्टरांना औषधांच्या चिठ्ठीवर म्हणजेच प्रिस्क्रीप्शनवर आरएक्स ऐवजी श्री हरी लिहावं असं सांगितलं आहे.
[read_also content=”अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपची माघार ? राजकीय घडामोडींना आला वेग https://www.navarashtra.com/maharashtra/bjp-to-withdraw-its-candidate-in-andheri-by-election-nrsr-336923.html”]
हिंदी विमर्श या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री चौहान बोलत होते. गावागावांमध्ये डॉक्टरांची गरज आहे. हे डॉक्टर हिंदीमध्ये प्रीस्क्रीप्शन लिहितील असं चौहान यांनी म्हटलं आहे. जर क्रोसीन असं औषधाचं नाव लिहायचं असलं तर ते हिंदीत नाही लिहू शकत का? हिंदीत लिहिण्यात काय अडचण आहे? असा प्रश्न चौहान यांनी विचारला. तसेच, ‘वर श्रीहरी लिहा आणि खाली लिहून टाका क्रोसीन’ असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
ते पुढे म्हणाले की, आपण इंग्रजीविरोधी नसून राष्ट्रभाषेबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने सल्ला देत असल्याचा युक्तीवाद केला. डॉक्टरांकडून औषधांची नावं लिहून देताना प्रिस्क्रीप्शनवर आरएक्स अशी इंग्रजी अक्षरं लिहिली जातात. त्याऐवजी चिठ्ठीच्या वर श्रीहरी लिहावं, असं त्यांनी सांगितलं.
मोठ्यांनी लहान मुलांमध्ये हिंदीसंदर्भात असणारी मतं बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,असंही ते म्हणाले.