फोटो सौजन्य- pinterest
होळीच्या आधीच्या आठ दिवसांना होलाष्टक म्हणतात. या काळात शुभ केली जात नाही. होलाष्टक मंगळवार, 24 फेब्रुवारी रोजी सुरु होत आहे आणि 3 मार्च रोजी संपणार आहे. यावेळी, हा कालावधी पूर्ण आठ दिवसांचा असेल. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून असे मानले जाते की या दिवसांमध्ये केतू वगळता इतर ग्रह आक्रमक स्थितीत राहू शकतात, ज्याचा प्रभाव विशेषतः काही राशींवर दिसून येतो. या काळात काही राशींच्या लोकांना सावध राहण्याची गरज आहे. अन्यथा कोर्ट केसेस, जमीन-मालमत्तेचे वाद, वाढता खर्च आणि आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. कोणत्या राशींच्या लोकांनी सावध राहवे, जाणून घ्या
होलाष्टकचा काळ मेष राशींच्या लोकांसाठी व्यस्तता आणि मानसिक ताण वाढवू शकते. अनावश्यक धावपळ आणि मालमत्तेशी संबंधित वाद उद्भवू शकतात. जमीन किंवा घराबाबत मतभेद होण्याची शक्यता आहे, तुम्हाला कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते. कुटुंबामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. या काळात तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि पोटाशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.
कर्क राशीच्या लोकांना होलाष्टकाच्या काळामध्ये संयम बाळगावा लागणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. या काळात आरोग्याच्या बाबतीत तुमची पचनसंस्था, कमकुवत होऊ शकते, म्हणून संतुलित आहार घ्या. करिअरचे मोठे निर्णय सध्यासाठी पुढे ढकलणे चांगले. तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्या.
सिंह राशीच्या लोकांनी या काळात सावध राहण्याची गरज आहे. ढोंगी मित्र आणि स्वार्थी ओळखींपासून सावध राहावे. चुकीच्या सल्ल्यावर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका. कामात आणि व्यवसायात निष्काळजीपणा महागात पडू शकतो, म्हणून तुमच्या जबाबदाऱ्या गांभीर्याने घ्या. या काळात गुंतवणूक करणे टाळा आणि अनपेक्षित खर्चासाठी तयार रहा.
वृश्चिक राशीच्या लोकांनी या काळात खूप संयम बाळगण्याची गरज आहे. कामात विलंब आणि आर्थिक दबाव येऊ शकतो. तसेच आर्थिक अडचणींचा देखील सामना करावा लागू शकतो. व्यवसायात फसवणूक होण्याचा धोका आहे, म्हणून कागदपत्रे आणि भागीदारीबाबत सावधगिरी बाळगा. नातेसंबंधांमध्ये संवाद कायम ठेवा आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या कठोर परिश्रमात ढिलाई करू नये.
कुंभ राशीच्या लोकांनी त्यांच्या विरोधकांपासून सावध राहण्याची गरज आहे. या काळात मोठी गुंतवणूक करणे किंवा पैसे उधार देणे टाळा. प्रवास शक्य आहे, परंतु काळजीपूर्वक वाहन चालवा. हाडे किंवा दुखापत ही समस्या असू शकते. अहंकारापासून दूर राहा, अन्यथा नात्यात अंतर वाढू शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: होलिकादहनाच्या आधीचे आठ दिवस होलाष्टक म्हणून ओळखले जातात. पारंपरिक मान्यतेनुसार या काळात ग्रहस्थिती काहीशी अस्थिर असते, त्यामुळे शुभकार्ये टाळली जातात
Ans: आर्थिक व्यवहारात अडथळे, कुटुंबात गैरसमज, आरोग्याशी संबंधित किरकोळ त्रास, कामात विलंब किंवा तणाव
Ans: होलाष्टकादरम्यान मेष, कर्क, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांनी सावध राहावे






