प्रयागराजमध्ये भाविकांच्या गाडीला धडक (फोटो- सोशल मिडिया)
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. लाखो भाविक हे देश-विदेशातून प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. मात्र प्रयागराजमधून एक वाईट बातमी समोर येत आहे. प्रयागराज मार्गावर उभ्या असणाऱ्या ट्रकला भविकांच्या वाहनाने जोरदार धडक दिली आहे. या भीषण धडकेत 5 भविकांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते आहे.
वाराणसी जिल्ह्यातील रूपापूर या भागात हा भीषण अपघात झाला आहे. वाराणसी जिल्ह्यातील मिर्झामुराद पोलिस ठाण्याअंतर्गत भाजी मंडईच्या पुढे रुपापूर शिवम पब्लिक स्कूलच्या जवळ हा भीषण अपघात झाला आहे.
बातमी अपडेट होत आहे.
महाकुंभला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला
प्रयागराजमध्ये एक भीषण अपघात घडली आहे. बोलेरो गाडी आणि बसची धडक झाली आहे. या भीषण अपघातामध्ये 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 19 प्रवाशी जखमी झाले आहेत. मृत्यूमुखी पडलेले सर्व प्रवासी बोलेरोमधून प्रवास करत होते. अपघाताची माहिती कळताच पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील कारवाईस सुरुवात केली. रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमी प्रवाशांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रयागराज- मिर्झापुर हायवेवर बोलेरो आणि बसचा भीषण अपघात झाला. छत्तीसगडमधील भाविक महाकुंभमध्ये स्नान करण्यासाठी प्रयागराजच्या दिशेने चालले होते. मात्र काळाने त्यांच्यावर महाकुंभला जाण्याआधीच घाला घातला आहे. यामध्ये 19 प्रवासी जखमी झाले आहेत. हे 19 प्रवासी बसमधून प्रवास करत होते. हे सर्व प्रवासी मध्यप्रदेशमधील राजगड जिल्ह्यात राहणारे प्रवासी होते.
समृद्धी महामार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू, पाचजण गंभीर जखमी
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे. या महामार्गावर सिन्नरजवळ एक भीषण अपघात झाला. इनोव्हा कारचा ताबा सुटल्याने ती साईड अँगलला धडकली. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कारमधील प्रवासी रत्नागिरी येथील असून, ते प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला आणि देवदर्शनासाठी गेले होते. समृद्धी महामार्गाने परतत असताना त्यांना हा दुर्दैवी अपघात झाला.
हेही वाचा: Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू, पाचजण गंभीर जखमी
रत्नागिरी येथील सात जण कारने प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते. शनिवारी पहाटे, ते समृद्धी महामार्गाने घरी परतत असताना वावी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मलढोण शिवारात सकाळी सुमारे सहाच्या सुमारास त्यांच्या कारवरील चालकाचा ताबा सुटला, त्यामुळे ती पुढील वाहनावर धडकली. या भीषण अपघातात रत्नागिरी माळनाका येथील डीएड महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई (६९), अथर्व किरण निकम (२४) आणि चालक भाग्यवान झगडे (५०) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच निवृत्त सहाय्यक निबंधक किरण निकम (५८), रमाकांत पांचाळ (६०), रत्नागिरी येथील मंदिराचे विश्वस्त संतोष रेडीज (५०) आणि प्रांजल प्रकाश साळवी (२४) हे जखमी झाले आहेत. किरण निकम यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.