मुळशी रस्त्यावर पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टूरचा अपघात झाला असून यामध्ये सहा सायकलस्वार स्पर्धक जखमी झाले आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुळशीतील कोळवण रोडवरून ही स्पर्धा जात असताना रस्त्याची रुंदी अचानक कमी झाली. ताशी ६० ते ७० किमी वेगाने धावणाऱ्या सायकलपटूंना या अरुंद रस्त्याचा आणि तीव्र वळणाचा अंदाज आला नाही. आघाडीच्या सायकलपटूचा ताबा सुटल्याने मागून येणारे खेळाडू एकापाठोपाठ एक एकमेकांवर आदळले. या साखळी अपघातामुळे अनेक खेळाडू ट्रॅक सोडून बाजूला फेकले गेले.
हे देखील वाचा : प्रदूषणमुक्तीसाठी पुण्याचे मोठे पाऊल; ‘प्रोलॉग’ रेसने सायकलिंग स्पर्धेचा दिमाखदार प्रारंभ
या अपघातामध्ये 70 सायकलपटू एकमेकांवर आदळले आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सायकलस्वार असलेले 7 स्पर्धक दुखापतग्रस्त झाले आहेत. यामुळे प्रशासन आणि नियोजकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. काल सोमवार (दि.19 जानेवारी) रोजी स्पर्धेचा पहिला टप्पा म्हणजेच ‘प्रोलॉग’ (Prolog) पार पडला.शहराच्या मध्यभागी झालेल्या पहिल्या टप्प्याचा अनुभन हा पुणेकरांनी घेतला. Prologue स्पर्धेचा उद्देश: यातून स्पर्धकांचा वेग (Speed), तांत्रिक कौशल्य आणि शारीरिक क्षमतेची चाचणी घेतली जाईल.
मुळशी-कोळवण रस्त्यावर अपघात
या स्पर्धेमध्ये एकूण १६५ स्पर्धक यात सहभागी झाले असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकलपटू सहभागी झाले आहेत.या मध्ये ४०० किलोमीटरचा थरार असून ४ टप्प्यांत होणार स्पर्धा होणार आहे. आज या स्पर्धेचा दुसरा भाग पार पडत आहे. दुसऱ्या भागामध्ये पुणे-पुरंदर-राजगड-हवेली-पीसीएमसी असा मार्ग होता. मात्र मुळशीमध्ये अपघात झाल्याचे समोर आला आहे. या अपघाताचा परिणाम सहा खेळाडूंच्या स्पर्धेवर होणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.
हे देखील वाचा : पुणेकरांना मनस्ताप? Grand Challenge Tour मुळे ‘हे’ रस्ते बंद; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
या स्पर्धेत देश-विदेशातील अव्वल दर्जाच्या सायकलस्वारांनी नोंदणी केली असून पुण्याला जागतिक सायकलिंग नकाशावर स्थान मिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे. सहा महिन्यांची पूर्वतयारी: मार्गाची निवड, खेळाडूंची सुरक्षा आणि तांत्रिक बाबींसाठी प्रशासकीय पातळीवर गेल्या सहा महिन्यांपासून सूक्ष्म नियोजन सुरू होते. मात्र तरी देखील मुळशीमध्ये सायकलस्वारांचा अपघात झाला आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहा खेळाडू जखमी झाल्यामुळे नियोजनावर ताशेरे ओढले जात आहेत. अचानक झालेल्या अरुंद रस्त्यामुळे हा अपघात झाला आहे. काही सायकलस्वार हे शेजारी असणाऱ्या शेतीमध्ये पडल्याचे देखील दिसून आले.






