प्रयागराजमध्ये कोसळले IAF चे विमान (फोटो- istockphoto)
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये आयएएफच्या विमानाला अपघात
हवेत नियंत्रण सुटल्याने थेट तलावात कोसळले
लोकांनी वाचवला पायलटचा जीव
उत्तर प्रदेश राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तरप्रदेशमधील प्रयगराज येथे भारतीय वायू सेनेच्या विमानाला अपघात झाला आहे. हवाई दलाच्या विमानाचा हवेत तोल गेल्याने ते थेट तलावात कोसळल्याची घटना घडली आहे. प्रयागराजमधील मध्यभागी असलेल्या एका शहरात ते कोसळले.
प्रयागराजमधील केपी कॉलेजच्या मागे असलेल्या तलावात भारतीय वायू सेनेचे विमान कोसळले आहे. वायू सेनेचे हे एक प्रशिक्षणार्थी विमान असल्याचे समोर येत आहे. विमान कोसळताच मोठा स्फोट झाला. अपघात घडतंच आजूबाजूचे स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. विमान कोसळण्याच्या आधीच दोन जणांनी पॅरॅशूटच्या माध्यमातून उडी मारली. स्थानिकांनी त्यांना वाचवले.
#WATCH | A trainee aircraft of the Indian Air Force crashes into a pond in Prayagraj, Uttar Pradesh Details awaited. pic.twitter.com/jq5KyFW8Gc — ANI (@ANI) January 21, 2026
अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलास माहिती दिली. तातडीने प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. कॉलेजमध्ये असताना अचानक मोठा आवाज आला असे घटनास्थळी असणाऱ्या लोकांनी सांगितले. आवाजाच्या दिशेने गेले असतं तलावात दोन जण फसलेले दिसले. त्यांना लोकांनी त्या तलावातून बाहेर काढले.
Odisha मध्ये चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात
ओडिशातील राउरकेला हवाई पट्टीपासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर एका चार्टर्ड विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाडानंतर अवघ्या १० किलोमीटर अंतरानंतर लँडिंग करण्यात आले. या अपघातात पायलटला गंभीर दुखापत झाली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकूण सहा जण जखमी झाले आहेत. तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले, ज्यामुळे सर्वांना वेळेत सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
Odisha plane crash: चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात! पायलटसह 6 जण जखमी
विमानात कॅप्टन नवीन कडंगा आणि कॅप्टन तरुण श्रीवास्तव यांच्यासह चार प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स होते. अधिकाऱ्यांनी या घटनेत सहा जण जखमी झाल्याची पुष्टी केली. सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विमानात कॅप्टन नवीन कडंगा आणि कॅप्टन तरुण श्रीवास्तव यांच्यासह चार प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स होते. अधिकाऱ्यांनी या घटनेत सहा जण जखमी झाल्याची पुष्टी केली. सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर अग्निशमन दलाच्या तीन पथकांनी बचाव कार्यात सहभाग घेतला. अपघाताची माहिती मिळताच बचाव कार्याला तात्काळ सुरुवात झाली. स्थानिक रहिवासी आणि पोलिसांनीही बचाव कार्यात मदत केली, म्हणूनच लोकांना वेळीच बाहेर काढण्यात आले.






