Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live : नायजेरियात पेट्रोल घेऊन जाणाऱ्या टँकरचा मोठा स्फोट; 31 जणांचा मृत्यू

Marathi Breaking Live Marathi : देश-विदेशसह राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन, अर्थविश्वसह इतर महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींसाठी 'नवराष्ट्र'ला भेट देत राहा...

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 22, 2025 | 01:35 PM
LIVE
Top Marathi News Today : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

Top Marathi News Today : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

Follow Us
Close
Follow Us:
  • 22 Oct 2025 01:35 PM (IST)

    22 Oct 2025 01:35 PM (IST)

    Delhi Air Pollution : दिल्लीकरांचा श्वास कोंडला!

     संपूर्ण देशामध्ये दीपावली सणाचा मोठा उत्साह आहे. दिवाळीच्या निमित्ताने राजधानी दिल्लीसह देशातील कानाकोपऱ्यामध्ये आतिषबाजी केली जात आहे. फटाके फोडत दिवाळी साजरी केली जात असली तरी यामुळे हवेची गुणवत्ता कमी होत आहे. राजधानी दिल्लीमध्ये ग्रीन फटाके फोडण्याची फक्त परवानगी असताना देखील एका रात्रीमध्ये प्रदुषणाचा उच्चांक गाठला. दिल्ली शहराने मागील चार वर्षांचा प्रदुषणाचा रेकॉर्ड मोडला आहे. यामुळे दिल्लीकरांचा श्वास कोंडला असून हवा प्रदुषित झाली आहे.

  • 22 Oct 2025 01:25 PM (IST)

    22 Oct 2025 01:25 PM (IST)

    अरे देवा! शिल्पा शेट्टीचे ‘हे’ रेस्टॉरंट आहे कुबेराचा खजिना

    शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा हे एका फसवणुकीच्या प्रकरणात अडकले आहेत, ज्यात त्यांनी जुहू येथील एका व्यावसायिकाला ₹60.48 कोटी (US$1.2 दशलक्ष) फसवल्याचा आरोप केला आहे. हा खटला न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणात अडकल्यानंतर काही वेळातच, बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने चाहत्यांना माहिती दिली की तिने आर्थिक अडचणींमुळे मुंबईतील वांद्रे येथील तिचे “बास्टियन” रेस्टॉरंट बंद केले आहे. ही आश्चर्यकारक बातमी होती, कारण ते केवळ सामान्य लोकांमध्येच नाही तर उच्चभ्रू लोकांमध्येही आवडते बनले होते. मात्र असे काहीच झाले नाही तर बास्टियनमध्ये आता बुकिंग कसे सुरू करता येणार यासाठी ती एक PR स्ट्रॅटेजी होती.

  • 22 Oct 2025 01:05 PM (IST)

    22 Oct 2025 01:05 PM (IST)

    व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा उत्सव साजरा

    Diwali Celebration at White House : वॉशिंग्टन : सध्या संपूर्ण भारतात दिवाळीचा आनंद पाहायला मिळत आहे. पण केवळ भारतातच नाही तर परदेशातही दिवाळीची धूम पाहायला मिळत आहे. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा उत्सव साजरा करण्यात आला आहे. अगदी पारंपारिक पद्धातीने दिवा प्रज्वलित करुन भारतीयांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी शुभेच्छा दिल्या आहे. या प्रसंगी त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी फोनवरुन संपर्क साधल्याचे आणि  व्यापारासह विविध विषयांवर चर्चा केल्याचा दावा केला आहे.

  • 22 Oct 2025 12:55 PM (IST)

    22 Oct 2025 12:55 PM (IST)

    शाळेत असूनही राज्यातील 10 लाख 77 हजार विद्यार्थी शाळाबाह्य ठरणार

    राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची आधारकार्डच्या आधारे नोंदणी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याने राज्यातील 4 लाख 98 हजार 759 विद्यार्थी शाळाबाह्य ठरली. तर आधारकार्ड वैधतेविना 5 लाख 78 हजार 433 विद्यार्थी शाळाबाह्य ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे राज्यातील 10 लाख 77 हजार 192 विद्यार्थी शाळेत असूनही पटसंख्येवरून गायब होणार असून, त्यांच्यावर शाळाबाह्य ठरण्याचा ठपका बसणार आहे.

  • 22 Oct 2025 12:45 PM (IST)

    22 Oct 2025 12:45 PM (IST)

    मुंबई महापालिकेत बदली-बढती घोटाळ्याची चौकशीसाठी एसआयटी स्थापन करा

    मुंबई महापालिकेतील 156 अभियंत्यांच्या बदलीत अनियमितता झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने आरोप केला आहे. या प्रकरणी विशेष पथक स्थापन करून चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेत 677अभियंत्यांची पदे रिक्त आहेत.

  • 22 Oct 2025 12:35 PM (IST)

    22 Oct 2025 12:35 PM (IST)

    छठपूजेनिमित्तानं मुंबई, पुण्यावरून मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वेगाड्या

    छठपूजेनिमित्ताने मुंबई, पुण्यावरून उत्तर आणि पूर्व भारतात जाण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी निघाले आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं 1,998 गाड्यांचे नियोजन केलं आहे. दिवाळी-छठ पुजेनिमित्ताने भारतीय रेल्वेने 12,011 विशेष रेल्वेगाड्या चालवत आहेत.

  • 22 Oct 2025 12:25 PM (IST)

    22 Oct 2025 12:25 PM (IST)

    'एनईपी'मुळे प्राध्यापक अतिरीक्त ठरण्याची भीती; विद्यार्थी संख्या तीन वर्षात घटली

    नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांच्या कार्याबाबत सरकारकडून कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच नव्या अभ्यासक्रम रचनेमुळे काही विषयांमधील विद्यार्थ्यांची संख्या मागील तीन वर्षात कमी झाली आहे. यामुळे मुंबईसह राज्यातील विविध महाविद्यालयांमधील अनेक प्राध्यापक अतिरीक्त ठरण्याची शक्यता वर्तवली आहे.

  • 22 Oct 2025 12:20 PM (IST)

    22 Oct 2025 12:20 PM (IST)

    लँडिंगवेळी हेलिपॅड ढांचा अचानक कोसळला; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू थोडक्यात बचावल्या

    केरळमधील पथनमथिट्टा इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे हेलिकॉप्टर उतरणार आज बुधवारी सकाळी गोंधळ उडाला. अचानक हेलिपॅडचा एक भाग कोसळला अन् काही वेळातच सुरक्षा यंत्रणांमध्ये घबराट पसरली. राष्ट्रपती शबरीमला इथल्या भगवान अय्यप्पा मंदिराचे दर्शन घेण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून जात होत्या. सुदैवानं, एक मोठी दुर्घटना टळली आणि सर्वजण सुरक्षित आहेत.

  • 22 Oct 2025 12:00 PM (IST)

    22 Oct 2025 12:00 PM (IST)

    नागपूरमधील रिलायन्स स्मार्ट स्टोअरमध्ये भीषण आग

    नागपूरमध्ये दिवाळी साजरी करत असताना, सोमवारी रात्री गजबजलेल्या आठ रास्ता चौकात असलेल्या रिलायन्स स्मार्ट स्टोअरमध्ये अचानक भीषण आग लागली. काही मिनिटांतच आगीने संपूर्ण स्टोअरला वेढले, ज्यामुळे आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली. स्थानिक रहिवाशांनी दुकानातून धूर निघताना पाहिले आणि त्यांनी तात्काळ अग्निशमन विभाग आणि पोलिसांना माहिती दिली. या माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या आठ हून अधिक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. आग इतकी भीषण होती की आजूबाजूचा परिसर धुराने वेढला गेला होता, त्यामुळे अनेक दुकानदारांना सुरक्षिततेसाठी त्यांचे दुकान बंद करावे लागले.

  • 22 Oct 2025 11:50 AM (IST)

    22 Oct 2025 11:50 AM (IST)

    'नौटंकी 'मुळेच त्यांना एका शेतकऱ्याच्या मुलाने पराभूत - नवनीत राणा

    माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांना आता खुले आव्हान दिले आहे. अनेक लोक आजीचे माजी झालेत. कारण, त्यांनी कधीच आपल्या खिशात हात टाकला नाही. त्यांच्याकडे फक्त 'इनकमिंग', 'आऊटगोइंग' नाही. us मी त्यांना दहावेळा म्हणाले की, तुमची संपत्ती मला द्या, माझी संपत्ती तुम्ही घ्या. 'नौटंकी 'मुळेच त्यांना एका शेतकऱ्याच्या मुलाने पराभूत केले, अशी टीका नवनीत राणा यांनी केली.

  • 22 Oct 2025 11:40 AM (IST)

    22 Oct 2025 11:40 AM (IST)

    चेन्नईसह तामिळनाडूच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पूराची शक्यता

    दक्षिण बंगालच्या उपसागरावर वरच्या हवेतील चक्राकार अभिसरण निर्माण झाल्यामुळे तामिळनाडूच्या किनारी भागात चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, बुधवारी दुपारपर्यंत ते पश्चिम-वायव्येकडे सरकण्याची आणि नैऋत्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर, उत्तर तामिळनाडू, पुडुचेरी-करैकल आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. ते पश्चिम-वायव्येकडे उत्तर तामिळनाडू, पुद्दुचेरी-करैकल आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे आणि पुढील २४ तासांत त्याची तीव्रता आणखी वाढेल. गेल्या आठवड्यात राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चेन्नईसह तामिळनाडूच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पूराची शक्यता निर्माण झाली आहे.

  • 22 Oct 2025 11:30 AM (IST)

    22 Oct 2025 11:30 AM (IST)

    PM मोदींनी दिल्या अमित शाहांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले आहे की, गृहमंत्री अमित शहा  यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सार्वजनिक सेवेतील त्यांच्या समर्पणाबद्दल आणि कष्टाळू स्वभावाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जाते. भारताच्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणेला बळकटी देण्यासाठी आणि प्रत्येक भारतीयाला सुरक्षित आणि सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी त्यांनी प्रशंसनीय प्रयत्न केले आहेत. त्यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी अमित शाहांना शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 22 Oct 2025 11:20 AM (IST)

    22 Oct 2025 11:20 AM (IST)

    मुंबईत फटाक्यांनी बिघडवली हवेचे गुणवत्ता

    लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने मंगळवारी मुंबईत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली, ज्याचा थेट परिणाम शहराच्या हवेच्या गुणवत्तेवर झाला आहे. मंगळवारी मुंबईचा हवा निर्देशांक तब्बल 211 इतका नोंदवला गेला आहे. हा हवा निर्देशांक वाईट श्रेणीत मोडतो. फटाक्यांमुळे रात्रीच्यावेळेत हवेत सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सकाळी वातावरण धुरकट दिसते आहे. कुलाबा, अंधेरी, बांद्रा, गोरेगाव आणि मुलुंड या भागांत प्रदूषणाचा स्तर सर्वाधिक नोंदवला गेला आहे. म्हणजे या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी होण्याचं प्रमाण जास्त आहे.

     

  • 22 Oct 2025 11:10 AM (IST)

    22 Oct 2025 11:10 AM (IST)

    डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करुन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. याबाबत मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी ट्वीट करत लिहिले आहे की, राष्ट्रपती ट्रम्प, तुमच्या फोन कॉलबद्दल आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. प्रकाशाच्या या सणानिमित्त, आपले दोन महान लोकशाही जगाला आशेने प्रकाशित करत राहोत आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध एकत्र उभे राहोत, अशा सूचक शुभेच्छा पंतप्रधान मोदींनी दिल्या आहेत.

  • 22 Oct 2025 11:00 AM (IST)

    22 Oct 2025 11:00 AM (IST)

    केंद्रीय मंत्री आणि राजकारणी अमित शाह यांचा वाढदिवस

    देशाचे केंद्रीय मंत्री आणि राजकारणी अमित शाह यांचा आज वाढदिवस आहे. अमित शहा यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९६४ रोजी झाला. १९७८ मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये प्रवेश केला. १९९७ सालापासून अहमदाबादमधून गुजरात विधानसभेवर निवडून येत असलेल्या अमित शहांनी नरेंद्र मोदी ह्यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रीपदे भुषवली. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. अमित शाह यांची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा असते.

  • 22 Oct 2025 10:55 AM (IST)

    22 Oct 2025 10:55 AM (IST)

    व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा उत्सव साजरा

    सध्या संपूर्ण भारतात दिवाळीचा आनंद पाहायला मिळत आहे. पण केवळ भारतातच नाही तर परदेशातही दिवाळीची धूम पाहायला मिळत आहे. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा उत्सव साजरा करण्यात आला आहे. अगदी पारंपारिक पद्धातीने दिवा प्रज्वलित करुन भारतीयांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी शुभेच्छा दिल्या आहे. या प्रसंगी त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी फोनवरुन संपर्क साधल्याचे आणि  व्यापारासह विविध विषयांवर चर्चा केल्याचा दावा केला आहे.

  • 22 Oct 2025 10:50 AM (IST)

    22 Oct 2025 10:50 AM (IST)

    ‘समजलं तर ठीक, नाहीतर पुढच्यावेळी सरळ गोळी…’, कॅनडात पंजाबी गायक तेजी कहलोंवर गोळीबार

    रोहित गोदरा यांच्याशी संबंधित गँगस्टर महेंद्र सरनने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, “सर्व भावांना जय श्री राम, राम राम. मी (महेंद्र सरन दिलाना) (राहुल रिनौ) (विकी फलवान), बंधूंनो, आम्ही कॅनडामध्ये तेजी कहलोन यांच्यावर गोळीबार करण्याची योजना आखली होती. त्याच्या पोटात गोळी लागली आहे. जर त्याला समजले तर ठीक आहे, नाहीतर पुढच्या वेळी त्याला मारून टाकू! तो आपल्या शत्रूंना आर्थिक मदत करत होता, शस्त्रे पुरवत होता, कॅनडामधील आपल्या भावांबद्दल माहिती देत ​​होता आणि त्यांच्यावर हल्ल्यांचे नियोजनदेखील करत होता. जर कोणी आपल्या भावांकडे पाहण्याचा विचार केला तर त्यांना पाहणे तर सोडाच, त्यांना पाहणे तर सोडाच, त्यांना इतिहासाच्या पानांमध्ये प्रतिध्वनीत होईल अशा नशिबाला सामोरे जावे लागेल.”

  • 22 Oct 2025 10:40 AM (IST)

    22 Oct 2025 10:40 AM (IST)

    ऐन दिवाळीत पाऊस धुमाकूळ घालणार, ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट

    हवामान विभागाने आज राज्यातील अनेक भागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच रायगड, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्याच्या उर्वरित भागात आकाश ढगाळ राहणार असून, हवामान मुख्यतः कोरडे राहील. उकाड्याचा चटका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

  • 22 Oct 2025 10:30 AM (IST)

    22 Oct 2025 10:30 AM (IST)

    आता लाँचपूर्वीच टेस्ट करू शकणार Pixel फो

    तुम्ही पाहिले असेल की स्मार्टफोन कंपन्या लाँचपूर्वी त्यांचा स्मार्टफोन रिव्हील करत नाही. कारण स्मार्टफोन पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसावा असं कंपन्यांना सतत वाटतअसतं. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली परंपरा आता गूगल बदलणार आहे. कारण गुगल आता एक नवीन ट्रेंड सेट करण्याच्या प्रयत्नात आहे. खरं तर कंपनी त्यांचा पिक्सेल टेस्टिंग प्रोग्राम सर्व ग्राहकांसाठी सुरु करण्याचा विचार करत आहे. असं सांगितलं जात आहे की, 15 आउटसाइडर लाँचपूर्वी पिक्सेल फोनची टेस्टिंग करू शकणार आहेत. गूगलने यासाठी त्यांच्या ट्रस्टेड टेस्टर प्रोग्रामसाठी 15 सुपरफॅनची भर्ती देखील सुरु केली आहे. हे सुपरफॅन स्मार्टफोनची टेंस्टिंग करून इतर ग्राहकांना फीडबॅक देखील देऊ शकणार आहे.

  • 22 Oct 2025 10:20 AM (IST)

    22 Oct 2025 10:20 AM (IST)

    ‘दिसायला सुंदर पण डोक्यात भरलाय भुसा’, शोएब अख्तरने उडवली प्रसिद्ध अभिनेत्रीची खिल्ली

    एका कार्यक्रमात शोएब अख्तरनं निदा यासिरला एक अतिशय सोपा प्रश्न विचारला – “पाकिस्ताननं १९९२ साली वर्ल्ड कप कधी जिंकला?” हा प्रश्न ऐकून जिथे सरासरी प्रेक्षक लगेच ‘१९९२’ हे उत्तर देतील, तिथे निदा यासिरनं उत्तर दिलं – “२००६”! हे उत्तर ऐकून शोएब एक क्षण गप्प झाला, आणि मग तसाच गालात हसत राहिला. वातावरणात हास्याचं वादळ उसळलं. एवढ्यावरच थांबता थोडंच! कार्यक्रमात उपस्थित असलेल्या दुसऱ्या तरुणीनं निदाच्या कानात खरं उत्तर हळूच सांगितलं. पण त्या आधीच शोएबनं नविन प्रश्न विचारला – “२००९ मध्ये पाकिस्ताननं टी-२० वर्ल्ड कप कधी जिंकला?”. या प्रश्नाला उत्तर देताना निदानं पुन्हा एकदा गोंधळ केला आणि उत्तर दिलं – “१९९२”! हे ऐकून अख्तरनं डोक्याला हात लावला आणि स्टुडिओत हास्याची लाट उसळली. हा क्षण सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला असून, अनेकांनी या गमतीदार प्रसंगावर मजेशीर कमेंट्स आणि मिम्स शेअर केले आहेत. काही लोकांनी चेष्टेने म्हटलं आहे की, “दिसायला सुंदर असली, पण हिच्या डोक्यात फक्त भुसा भरला आहे”.

  • 22 Oct 2025 10:10 AM (IST)

    22 Oct 2025 10:10 AM (IST)

    छठ पूजेसाठी तब्बल 12000 हून अधिक विशेष गाड्या धावणार

    रेल्वेमंत्र्यांच्या सूचनेनुसार, देशभरात 12000 हून अधिक विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. यामध्ये पूर्व किनारी रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या ३६७ विशेष गाड्यांचा समावेश आहे, त्यापैकी ७६ आधीच सुरू झाल्या आहेत आणि ७८००० हून अधिक प्रवाशांनी त्यांचा लाभ घेतला आहे. या गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) आणि इतर अधिकारी सर्व स्थानकांवर तैनात करण्यात आले आहेत. 900 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे देखील स्थानकांवर लक्ष ठेवून आहेत.

  • 22 Oct 2025 10:03 AM (IST)

    22 Oct 2025 10:03 AM (IST)

    सकाळी फॉलो केलेल्या ‘या’ चुकीच्या सवयींमुळे वाढतो हार्ट अटॅकचा धोका

    सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता केल्यास संपूर्ण शरीराला ऊर्जा मिळते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. रात्रभर कोणत्याही पदार्थांचे सेवन केले जात नाही. यामुळे मेटाबॉलिझम प्रक्रिया मंदावते आणि शरीराच्या कार्यात अडथळे येतात. त्यामुळे सकाळच्या नाश्ता केल्यास मेटाबॉलिझम प्रक्रिया सुरळीत होऊन शरीराचे कार्य सुधारते. शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी साठवलेले ग्लुकोज आणि फॅट वापरले जातात, ज्यामुळे रक्तातील साखर अनियमित होते. यामुळे शरीरात शरीरात ‘कोर्टिसोल’ नावाचे स्ट्रेस हार्मोन्स वाढते. हार्मोन्सचे प्रमाण वाढल्यानंतर रक्तदाब आणि हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम होण्याची शक्यता असते. शरीरात वाढलेल्या खराब कोलेस्टरॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा होण्यास सुरुवात होते. दैनंदिन आहारात सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराचे नुकसान होते. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचा पिवळा थर जमा होऊ लागतो

  • 22 Oct 2025 09:50 AM (IST)

    22 Oct 2025 09:50 AM (IST)

    गूगल क्रोमला टक्कर देण्यासाठी OpenAI सज्ज

    दिवाळीच्या मुहूर्तावर OpenAI ने त्यांच्या युजर्सना एक खास सरप्राईज दिलं आहे. अमेरिकी कंपनी OpenAI ने गुगल क्रोमला टक्कर देण्यासाठी त्यांचे नवीन ChatGPT Atlas ब्राउझर लाँच केले आहे. ChatGPT वर आधारित असणारे हे AI पावर्ड ब्राउझर गूगल क्रोमला टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहे. आता हे ब्राउझर केवळ मॅकOS साठी उपलब्ध आहे आणि पुढील काळात हे ब्राउझर विंडोज, iOS आणि अँड्रॉईडसाठी देखील लाँच केले जाणार आहे. OpenAI च्या या ब्राऊझरमध्ये असे अनेक फीचर्स आहेत, जे गूगल क्रोमला टक्कर देणार आहे. OpenAI च्या या नव्या ब्राऊझरमुळे आता गुगल क्रोमच्या अडचणी वाढणार आहेत.

  • 22 Oct 2025 09:40 AM (IST)

    22 Oct 2025 09:40 AM (IST)

    शोएब अख्तरने उडवली प्रसिद्ध अभिनेत्रीची खिल्ली

    पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरी त्याचं सोशल मीडियावरचं अस्तित्व अजूनही तितकंच प्रभावी आहे. विविध मुलाखती, टीव्ही कार्यक्रम किंवा सोशल मीडियावरच्या पोस्ट्समुळे तो नेहमी चर्चेत असतो. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये त्याने पाकिस्तानची प्रसिद्ध मॉडेल आणि सूत्रसंचालिका निदा यासिरची गंमतीशीर फजिती केली, आणि हा क्षण इंटरनेटवर जोरदार व्हायरल झाला आहे.

  • 22 Oct 2025 09:30 AM (IST)

    22 Oct 2025 09:30 AM (IST)

    भारतात या ठिकाणी वाहतात 17 नद्या

    “जर तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात राहायला आवडत असेल, तर आज आपण तुम्हाला उत्तर प्रदेशातील एका अशा सुंदर ठिकाणाबद्दल सांगणार आहोत जिथे तब्बल 17 नद्या वाहतात. हे ठिकाण म्हणजे आजमगढ जिल्हा, ज्याला नद्यांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. या जिल्ह्याच्या पूर्वेला मऊ, पश्चिमेला सुलतानपूर, उत्तरेला गोरखपूर, आग्नेय दिशेला गाजीपूर आणि नैऋत्येला जौनपूर हे जिल्हे आहेत. आजमगढ जिल्हा नैसर्गिक सौंदर्य, पौराणिक महत्त्व आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यासाठी प्रसिद्ध आहे.

  • 22 Oct 2025 09:20 AM (IST)

    22 Oct 2025 09:20 AM (IST)

    सोन्याच्या किमतीत आज पुन्हा बदल, चांदीचे भाव घसरले!

    भारतात 22 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,057 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,969 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,793 रुपये आहे. भारतात 22 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,19,690 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,30,570 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 97,930 रुपये आहे.

  • 22 Oct 2025 09:11 AM (IST)

    22 Oct 2025 09:11 AM (IST)

    करोडो iPhone यूजर्ससाठी लवकरच येतंय हे जबरदस्त फीचर

    MacRumors ने सांगितलं आहे की, Apple ने iOS 26.1 बीटा वर्जनमध्ये Liquid Glass साठी नवीन टिंटेड थीम ऑप्शन सादर केलं आहे. म्हणजेच आता युजर्सची इच्छा असेल तर ते आधीचा क्लियर लूक देखील परत वापरू शकणार आहेत किंवा नवीन टिंटेड थीम सेलेक्ट करू शकतात. ही नवीन टिंटेड थीम UI ची ट्रांसपेरेंसी कमी करते, ज्यामुळे कंट्रोल्स आणि बटन जास्त क्लियर पाहायला मिळतात. यासोबतच हे इंटरफेसमध्ये चांगले कॉन्ट्रास्ट देखील जोडेल, ज्यामुळे दृश्यमानता आणखी चांगली होईल.

  • 22 Oct 2025 08:50 AM (IST)

    22 Oct 2025 08:50 AM (IST)

    दिवाळीत ६.०५ लाख कोटींचा बंपर व्यवसाय, चीनच्या उत्पादनांना मोठा फटका

    यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर भारतामध्ये विक्रमी ६.०५ लाख कोटींची (6.05 Lakh Crore) विक्रमी विक्री झाली आहे. यामध्ये ५.४० लाख कोटी रुपयांची उत्पादने आणि ६५,००० कोटी रुपयांच्या सेवांचा समावेश आहे. व्यापारी संघटना ‘कनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ (CAIT) ने मंगळवारी ही माहिती दिली.

  • 22 Oct 2025 08:40 AM (IST)

    22 Oct 2025 08:40 AM (IST)

    लक्ष्मीपूजनदिवशीच वरूणराजाने लावली हजेरी; मुंबईसह अनेक भागात मुसळधार पाऊस

    सध्या सगळीकडे दिवाळीचा उत्साह आहे. आज सर्वत्र लक्ष्मीपूजन संपन्न होत आहे. दरम्यान आज लक्ष्मीपुजनाला वरुणराजाने देखील हजेरी लावली आहे. गेले दोन ते तीन दिवस राज्यात उकाडा वाढला होता. तसेच पावसासाठी पोषक हवामान देखील तयार झाले होते. आज संध्याकाळच्या सुमारास पावसाने राज्यातील अनेक भागात हजेरी लावली आहे.

  • 22 Oct 2025 08:35 AM (IST)

    22 Oct 2025 08:35 AM (IST)

    टाटा पॉवर प्रकल्पात कामगारांचा संताप; ‘काळी दिवाळी’ साजरी करून प्रशासनाला इशारा

    टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडच्या पळसावडे प्रकल्पातील भूमिपुत्र कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे कंपनी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी एक अनोखे आंदोलन केले. पारंपरिक आनंदाऐवजी ‘काळी दिवाळी’ साजरी करून कामगारांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.

Marathi Breaking News Updates : आफ्रिकन देशांत दोन मोठ्या दुर्घटना घडल्या. एक नायजेरियात तर दुसरी घटना इथिओपियामध्ये घडली. नायजेरियात पेट्रोल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा मोठा स्फोट झाला. यामध्ये 31 जणांचा मृत्यू झाला तर पूर्व इथिओपियामध्ये दोन रेल्वेगाड्यांची एकमेकांना जोरदार धडक होऊन अपघात झाला. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या दिली जात आहे.

पूर्व इथिओपियामध्ये सोमवारी रात्री एका ट्रेनची थांबलेल्या दुसऱ्या ट्रेनशी धडक झाली, ज्यामध्ये किमान 14 जण ठार झाले आणि डझनभर जखमी झाले. व्यापारी आणि त्यांचा माल घेऊन जाणारी ट्रेन जिबूती सीमेजवळील देवाले शहरातून परतत असताना डायर डाव शहराजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर जखमींना मदत पोहोचण्यास उशीर झाल्याचे आता सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी अपघातग्रस्तांना डब्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

दुसऱ्या एका अपघातात, मंगळवारी नायजर राज्यातील बिदा प्रदेशात पेट्रोल वाहून नेणाऱ्या टँकर ट्रकचा स्फोट झाला, ज्यामध्ये 31 जणांचा मृत्यू झाला असून, १७ जण जखमी झाले आहेत. टँकर पटली झाल्यानंतर स्थानिक लोक सांडलेले इंधन गोळा करण्यासाठी धावले तेव्हा स्फोट झाला. यामध्ये जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Marathi breaking live updates marathi top news international news national news crime news live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 08:25 AM

Topics:  

  • international news
  • national news
  • Top Marathi News Today

संबंधित बातम्या

नायजेरियात पेट्रोल घेऊन जाणाऱ्या टँकरचा मोठा स्फोट; 31 जणांचा मृत्यू
1

नायजेरियात पेट्रोल घेऊन जाणाऱ्या टँकरचा मोठा स्फोट; 31 जणांचा मृत्यू

स्वतंत्र पॅलेस्टाईनशिवाय शांतता शक्य आहे का? आंतरराष्ट्रीय विध्यंवसाचे ठरतंय कारण
2

स्वतंत्र पॅलेस्टाईनशिवाय शांतता शक्य आहे का? आंतरराष्ट्रीय विध्यंवसाचे ठरतंय कारण

‘तणावामागे भारताचा हात’ हे पाकिस्तानचे आरोप ‘निराधार’; अफगाणिस्तानचे सडेतोड उत्तर, म्हणाले – ‘बेताल बडबड…’
3

‘तणावामागे भारताचा हात’ हे पाकिस्तानचे आरोप ‘निराधार’; अफगाणिस्तानचे सडेतोड उत्तर, म्हणाले – ‘बेताल बडबड…’

Lahore Air Pollution: लाहोरमध्ये वायु प्रदूषणाचा कहर! लोकांना श्वास घेणे झाले कठीण; पाकिस्तानने थेट भारतावर फोडले खापर
4

Lahore Air Pollution: लाहोरमध्ये वायु प्रदूषणाचा कहर! लोकांना श्वास घेणे झाले कठीण; पाकिस्तानने थेट भारतावर फोडले खापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.