महाकुंभमधील सेक्टर 22 मध्ये लागली भीषण आग (फोटो- ttwitter)
प्रयागराज: प्रयागराज महाकुंभमेळ्यातून मोठी बातमी समोर येत आहे. महाकुंभमध्ये पुन्हा काही भागात भीषण आग लागली आहे. प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. सेक्टर 22 मध्ये भीषण आग लागली आहे. या भीषण आगीत अनेक तंबू जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.ही आग इतकी भीषण आहे की आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले आहेत. तसेच, अग्निशमन दलाच्या पथकाने आजूबाजूचा संपूर्ण परिसर रिकामा केला आहे.
#WATCH | Fire broke out in a few tents erected in an open area under the Chatnag Ghat Police Station area in Prayagraj today. The fire was doused and there was no casualty in the incident as per the Fire Department
Video source: UP Fire Department pic.twitter.com/23kKEVkRkl
— ANI (@ANI) January 30, 2025
ज्या ठिकाणी आग लागली आहे. त्या ठिकाणी जास्त गर्दी नसल्याचे समोर येत आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. महाकुंभमध्ये सेक्टर 22 मध्ये भीषण आग लागली आहे. या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. लवकरच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळेल असा विश्वास तेथील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या आधी देखील लागली होती आग
महाकुंभ परिसरातील शास्त्री ब्रिज सेक्टर-१९ कॅम्पमध्ये भीषण आग लागली असून काही तंबू जळून खाक झाल्याचं सांगितलं जात होते. स्वयंपाक करताना सिलेंडरमध्ये स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर आग संपूर्ण परिसरात पसरली. तथापि, या दाव्याला अद्याप अधिकृतपणे पुष्टी मिळालेली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अखिल भारतीय धर्म संघ गीता प्रेस गोरखपूरच्या कॅम्पमध्ये आग लागली होती. ही आग इतकी भीषण होती की आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले होते.
हेही वाचा: Prayagraj Fire : प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात अग्नितांडव; अनेक तंबू जळून खाक
महाकुंभ चेंगराचेंगरी घटनेची न्यायालयीन चौकशी
प्रयागराज येथील महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर ६० जण जखमी झाले आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री योगी यांनी एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देखील जाहीर करण्यात आली आहे.
काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
ही घटना अत्यंत दुःखद आहे. भक्तांच्या निधनाने मला खूप दुःख झालं आहे, हा प्रसंग मला खूपच वेदना देणारा आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांप्रती संवेदना आहेत. आम्ही काल रात्रीपासून न्यायाधिकरण आणि पोलिस प्रशासनाच्या संपर्कात आहोत आणि जे काही व्यवस्था करता येईल ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, राज्य सरकारच्या वतीने आम्ही मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करत आहोत. न्यायिक आयोग संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल आणि निर्धारित वेळेत राज्य सरकारला आपला अहवाल सादर करेल. या संदर्भात, मुख्य सचिव आणि डीजीपी स्वतः एकदा प्रयागराजला भेट देतील आणि गरज पडल्यास त्या सर्व मुद्द्यांचा आढावा घेतला जाईल.