Photo Credit- Social Media पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी भारत उचलणार मोठे पाऊल; 'हे'असतील तीन पर्याय
Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पहलगामध्ये झालेल्या या हल्ल्यानंतर भारताकडून काय कारवाई होणार, याकडे संपूर्ण देशवासियांचे लक्ष लागले आहे. 2019 मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने केलेले सर्जिकल आणि एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला होता. आता या हल्ल्यानंतर केंद्रातील मोदी सरकार नेमंक काय करतय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे, पाकिस्तानला या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देणार, असल्याचा केंद्र सरकारनेही इशारा दिला आहे,
यावेळी सर्जिकल स्ट्राईक पेक्षाही काहीतरी मोठे करण्याची तयारी सुरू असल्याचे दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील, यावेळी दहशतवाद्यांना कल्पनेपलीकडे शिक्षा दिली जाईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे काहीतरी केले जाईल ज्याचा कदाचित दहशतवादाचे सूत्रधार विचारही करू शकणार नाहीत. पाकिस्तानला (Pakistan) धडा शिकवण्यासाठी मोदी सरकार निश्चितच तीन पर्यायांचा विचार करू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे सर्व पर्याय असे आहेत ज्यामुळे पाकिस्तानला मोठे नुकसान पोहोचवू शकतात. या पर्यायांद्वारे, संपूर्ण जगाला पुन्हा एकदा भारताची शक्ती जाणवेल.
१९७१ च्या धर्तीवर पाकिस्तानपासून जसा बांगलादेश वेगळा करण्यात आला, तसाच यावेळीही भारत पाकिस्तानचे तुकडे करू शकतो. माजी संरक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या मते, बलुचिस्तानला पाकिस्तानपासून वेगळे करून सर्वात मोठा धक्का दिला जाऊ शकतो. जर हा पर्याय अवलंबला गेला तर भारताला बलुच लिबरेशन आर्मीचाही पाठिंबा मिळेल. बांगलादेशच्या निर्मितीनंतर पाकिस्तानला हा दुसरा सर्वात मोठा धक्का असू शकतो.
भारत अनेक वर्षांपासून हाफिज सईदचा शोध घेत आहे, परंतु तो कुठे लपला आहे याबद्दल कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. पण हाफिज सईद (Hafij Saeed) पाकिस्तानातील मुरीदके येथे लपला असावा, अशी गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाली आहे. अशा परिस्थितीत, सैन्य थेट मुरडिके येथील लष्कर मुख्यालयाला लक्ष्य करू शकते. त्या एका हल्ल्यामुळे दहशतवाद्यांचे मनोबल पूर्णपणे खचून जाईल.
भारत अनेक वर्षांपासून हाफिज सईदचा शोध घेत आहे, परंतु तो कुठे लपला आहे याबद्दल कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. पण गुप्तचर यंत्रणांकडून अशी माहिती मिळाली आहे की तो पाकिस्तानातील मुरीदके येथे लपला असावा. अशा परिस्थितीत, सैन्य थेट मुरडिके येथील लष्कर मुख्यालयाला लक्ष्य करू शकते. त्या एका हल्ल्यामुळे दहशतवाद्यांचे मनोबल पूर्णपणे खचून जाईल.
जम्मू काश्मीरमधून उड्डाण घेणाऱ्या विमानांच्या तिकीट दरावर नियंत्रण ठेवावं;
बहावलपूरमध्ये जैशचे अनेक तळ सक्रियपणे कार्यरत असल्याचे गुप्तचर माहिती आहे. अशा परिस्थितीत त्यांना क्षेपणास्त्रांद्वारे लक्ष्य केले जाऊ शकते. जर असे कोणतेही पाऊल उचलले गेले तर जैशला मोठे नुकसान सहन करावे लागेल.
तर, काही तज्ञ POK परत घेऊ शकतात, असेही बोलले जात आहे. काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, जर भारताला पाकव्याप्त कश्मीर (POK) पुन्हा हवा असेल तर भारतीय सैन्य फक्त सात दिवसात पाकव्याप्त कश्मीर ताब्यात घेऊ शकते. सरकारमधील अनेक मंत्र्यांनीही वेळोवेळी हे निदर्शनास आणून दिले आहे. परंतु या मोहिमेसाठी अधिक वेळ, अधिक संसाधने लागतील आणि धोके देखील मोठे असतील.
आता फक्त लष्कर किंवा हवाई दलच कारवाई करेल असे नाही. भारतीय नौदल देखील मोठी भूमिका बजावू शकते. जर भारताने अरबी समुद्रात आपली जहाजे तैनात केली तर पाकिस्तानला मोठा धक्का बसू शकतो, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इंधन वेळेवर पोहोचणार नाही; इतर अनेक गोष्टींचा पुरवठा देखील विस्कळीत होईल. कारगिल युद्धादरम्यानही नौदलाने हे केले आहे. अशा परिस्थितीत मोदी सरकारसाठीही हा पर्याय खुला आहे.