Mehul Choksi Extradition : चोक्सी भारतीय नागरिक आहे का? मुंबई उच्च न्यायालयाचा ईडीला प्रश्न (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मुंबई: देशाच्या एका शत्रुचे म्हणजेच दहशतवादी तव्वहुर राणाचे भारतात प्रत्यार्पण झाले असून त्याच्यावर न्यायलयीन कारवाई सुरु आहे. दरम्यान आता भारताच्या दुसऱ्या फरार शत्रूला अटक करण्यात आली असून त्याच्या भारतात प्रत्यार्पणाची तयारी सुरु आहे. भारताची सुमारे 15 हजार कोटी रुपयांची फसवणूक करुन फरार झालेल्या मेहुल चोक्सीला बेल्जियम पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे भारतीयांमध्ये आशा निर्माण झाली आहे की, देशाचे इतर शत्रू दहशतवादी आणि फरार देशद्रोही देखील लवकरच पकडले जातील.
याच दरम्यान नपीएनबी बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील फरार आरोपी आणि हिरेव्यापारी मेहुल चोक्सी हा भारतीय नागरिक आहे का, की अन्य देशाचा नागरिक आहे, अशी विचारणा उच्च न्यायालयाने सक्तवसूली संचालनालयाला (ईडी) केली आहे. तसेच त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
मुंबई सत्र न्यायालयाने २०१८ मध्ये बजावलेले अजामीनपात्र वॉरंट (एनबीडब्ल्यू) रद्द करण्यासाठी चोक्सीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्या याचिकेची दखल घेऊन न्या. शिवकुमार डिगे यांच्या एकलपीठाने उपरोक्त विचारणा ईडीला केली. पंजाब नॅशनल बँकेच्या कथित कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेल्या चोक्सीला भारतीय तपास संस्थांनी केलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीनंतर १२ एप्रिल रोजी बेल्जियममध्ये अटक करण्यात आली होती.
चोक्सीने त्याचे भारतीय नागरिकत्व सोडून दिल्याची माहिती लंडनहून व्हिसीद्वारे उपस्थित वकील विजय अग्रवाल यांनी न्यायालयाला दिली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने वेणेगावकर यांना चोक्सीच्या नागरिकत्वाबाबत माहिती सादर करण्याचे आदेश देऊन प्रकरण २ मे रोजी ठेवले. दुसरीकडे, चोक्सीने आरोग्याच्या समस्यांमुळे प्रवास करण्यास आणि प्रत्यक्ष हजर राहण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे कारण देत व्हिसीमार्फत न्यायालयासमोर हजर राहण्याची परवानगी मागितली.
कॅनरा बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रशी संबंधित ५५ फसवणुकीप्रकरणी फरारी असलेला हिरेव्यापारी मेहुल चोक्सीविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्याची मागणी सीबीआयने केली आहे.
चोक्स हा एक हिरे व्यापरी आहे. गीतांजली ग्रुपचा मालक असून याचे 4 हजारांहून अधिक स्टोअर आहेत. चोक्सीने आपला पुतण्या नीरव मोदी याच्यासोबत मिळून पंजाब नॅशनल बँक मध्ये मोठा घोटाळा केला. दोघांवर बँकेची 13 कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक केल्याचा आरोप आहे. भारत सरकारने दोघांना फरार घोषित केले होते. सध्या चोक्सीच्या प्रत्यार्पणाची तयारी सुरु आहे. मात्र, पुतण्या नीरव मोदीचा अद्याप कोणताही पत्ता लागलेला नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Elon Musk लवकरच भारत दौऱ्यावर येणार; म्हणाले, “भारत भेटीसाठी…”