येत्या काही महिण्यात देशात लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) होणार आहे. या पार्श्वभुमीवर राजकीय नेते आपल्या पक्षाची शक्ती वाढवण्यात गुंतले आहे. एकीकडे आज काँग्रेसकडून भारत जोडो यात्रेला (Congress Bharat Jodo Yatra) सुरुवात करण्यात येत आहे तर दुसरीकजे काँग्रेसमध्ये एक मोठी घडामोड घडली आहे. काँग्रेस नेते मिलिंद देवरा (Millind Deora) त्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या बातमीनं देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. महत्त्वाचं म्हणजे मिलिंद देवरा आजच शिंदे गटात (Eknath Shinde Group) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
[read_also content=”आजपासून मणिपूरमधून सुरू होणार काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’, राहुल गांधी 15 राज्यांतील 100 लोकसभा मतदारसंघातून जाणार! https://www.navarashtra.com/india/congress-bharat-jodi-yatra-will-start-today-from-manipur-rahul-gandhi-will-visit-100-constituency-of-15-states-nrps-497833.html”]
दरम्यान, दक्षिण मुंबई मतदारसंघाबाबत (Mumbai South Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीत काहीशी धुसफूस असल्याचं दिसून येत आहे. ठाकरे गटाकडून (Thackeray Group) वारंवार दक्षिण मुंबई मतदारसंघावर दावा सांगण्यात आल्यापासूनच काँग्रेस नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अशातच याच नाराजीतून काँग्रेस नेते मिलिंद देवरा (Milind Deora) काँग्रेसची (Congress) साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत (Shinde Group) प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
Today marks the conclusion of a significant chapter in my political journey. I have tendered my resignation from the primary membership of @INCIndia, ending my family’s 55-year relationship with the party. I am grateful to all leaders, colleagues & karyakartas for their… — Milind Deora | मिलिंद देवरा ☮️ (@milinddeora) January 14, 2024






