देशातील 244 ठिकाणी आज 'मॉक ड्रिल'; जाणून घ्या नेमकं काय-काय होणार? (Photo : iStock)
मुंबई : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध आणखीन ताणले गेले आहेत. या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाचे सावट आहे. यादरम्यान, गृह मंत्रालयाने अनेक राज्यांना युद्धसज्जतेच्या पार्श्वभूमीवर आज संवेदनशील अशा 244 ठिकाणी ‘मॉक ड्रिल’ करण्याचा आदेश दिले आहेत. त्यानुसार, आता हे मॉक ड्रिल केले जाणार आहे. यात महाराष्ट्रातील 16 ठिकाणांचा समावेश आहे.
शत्रूच्या हल्ल्यादरम्यान नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि अशा वेळी कोणती खबरदारी घ्यायची, हे जाणून घेण्यासाठी हे मॉक ड्रिल आयोजित केले जात आहे. 1971 च्या युद्धानंतर म्हणजेच 56 वर्षांनी पहिल्यांदाच अशाप्रकारची सूचना देण्यात आली आहे, हे विशेष. गृह मंत्रालयानुसार, देशातील 244 जिल्हे, तालुक्यात मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात येणार आहे. यात महाराष्ट्रातील 15 जिल्हे, तालुक्यांचा समावेश आहे. मॉक ड्रिल काळात ब्लॅकआऊट केले जाईल. सायरन वाजल्यानंतर लोकांना सुरक्षितस्थळी लपण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
किनारी भागात सतर्कतेचा इशारा
महाराष्ट्र नागरी संरक्षण विभागाचे संचालक प्रभात कुमार म्हणाले की, ‘2010 पर्यंत नागरी संरक्षणाचे मुख्य उद्दिष्ट युद्धादरम्यान स्वयंसेवकांची भरती करणे होते. परंतु 2010 नंतर आपत्ती व्यवस्थापनाचाही त्यात समावेश करण्यात आला. आज, बुधवारी राज्यातील किनारी भागात मॉक ड्रिल घेण्यात येईल. मॉक ड्रिलमध्ये काय-काय करायचे हे शिकवले जाईल. केंद्र सरकारच्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार हायअलर्ट मोडवर आहे’.
‘मॉक ड्रील’मध्ये नेमके काय-काय होणार?