क्रौर्याचा कळस! नवजात बाळाला सोडलं रस्त्यावर, रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून...
उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथील बादलपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका महिलेनं आपल्या दोन निष्पाप मुलांची गळा आवळून हत्या केली आहे. आरोपी आईला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने तिची तुरुंगात रवानगी केली आहे. आरोपी महिला सोनम हापूर जिल्ह्यातील पिलखवा भागातील रहिवासी आहे. तिनं कुटुंबीयांच्या मर्जीविरुद्ध साहिल नावाच्या तरुणासोबत प्रेमविवाह केला होता.
सोनमचं लिव्ह-इन रिलेशनशिप
लग्नानंतर सोनमला दोन मुलं झाली. 2021 मध्ये साहिल एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी तुरुंगात गेला. दरम्यान, सोनमनं बादलपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोनू नावाच्या व्यक्तीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायला सुरुवात केली. पोलिस चौकशीत सोनमनं सांगितलं की, काही दिवसांपूर्वी तिला साहिलचा फोन आला होता, ज्यामध्ये त्यानं सांगितलं की तो तुरुंगातून सुटून बाहेर आला आहे.
साहिलच्या धमकीनं घाबरून सोनमला वाटलं की, तो तिचा आणि मुलांचा जीव घेईल. या भीतीमुळे आणि मानसिक तणावाखाली तिनं आपल्या 6 वर्षीय मुलगी आणि 4 वर्षीय मुलाचा गळा दाबून खून केला.
पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली
या घटनेवर बोलताना डीसीपी शक्ती मोहन अवस्थी यांनी सांगितलं की, पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे आरोपी महिलेला बादलपूर येथील सिद्ध बाबा मंदिराजवळ अटक केली. महिलेनं दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
डीसीपी अवस्थी यांनी पुढं सांगितलं की, आरोपी सोनमनं हापूर जिल्ह्यातील पिलखवा येथील रहिवासी साहिलसोबत कुटुंबाच्या परवानगीशिवाय विवाह केला होता. यामुळे सोनमचं माहेरच्या घरी येणं-जाणं बंद झालं होतं. साहिल आणि सोनमला दोन मुलं होती. परंतु, लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्या नात्यात वाद सुरू झाले. साहिलनं सोनमसोबत अनेकदा मारहाण केली होती.
2021 मध्ये साहिलनं एका व्यक्तीची हत्या केली आणि गाझियाबादच्या मसूरी पोलिसांनी त्याला तुरुंगात पाठवलं. साहिल तुरुंगात गेल्यानंतर सोनमनं बादलपूर येथील खेड़ा धर्मपुरा भागातील सोनूसोबत लिव्ह-इन रिलेशनशिप सुरू केली, आणि त्यांचं एक मूलही झालं.