
Reliance Received Bumper Diwali Gift : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Ltd) कंपनीला 20 हजार कोटींचं दिवाळी गिफ्ट (Diwali Gift) मिळालं आहे. कंपनीने 10 वर्षांचे बाँड विक्री किमतीला विकले आहेत. रिलायन्स कंपनीने त्यांचे 10 वर्षांच्या बाँडची 7.79 व्याज दराने विक्री केली आहे, ज्यामुळे कंपनीला 20 हजार कोटीची बंपर दिवाळी भेट मिळाली आहे. रिलायन्स लिमिटेड कंपनीने शेअर बाजारात यासंदर्भात माहिती दिली आहे.
रिलायन्सला 20 हजार कोटींची भेट
रिलायन्स कंपनीने सांगितले की, कंपनीने सोमवारी 1,00,000 रुपयांच्या दर्शनी मूल्याचे 20,00,000 सुरक्षित, रीडीमेबल, नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर (NCDs) जारी केले आहेत, हे खाजगी प्लेसमेंटच्या आधारावर जारी करण्यात आले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजने 7.79 टक्के व्याजाने रोखे जारी करून 20,000 कोटी रुपये उभे केले आहेत. गैर-वित्तीय भारतीय कंपनीचा हा सर्वात मोठा बाँड इश्यू आहे. व्याजदर सरकारच्या कर्ज खर्चापेक्षा 0.4 टक्के जास्त आहे. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत रिलायन्स इंडस्ट्रीजने सांगितलं आहे की, रिलायन्स कंपनीचे 10 वर्षांचे रोखे 7.79 टक्के व्याजाने विकले गेले आहेत.