आता फोनमध्येच सेव्ह होणार तुमची Digital Signature! Google लवकरच घेऊन येतोय नवा ॲप? यूजर्सना कसा होणार फायदा? जाणून घ्या
मीडिया रिपोर्टनुसार, गूगलने नवीन सिग्नेचर ॲप यूजर्सच्या सुविधेसाठी डिझाईन केले जात आहे. या सिग्नेचर ॲपचा मुख्य उद्देश यूजर्सची सुरक्षा आहे. खरं तर, या ॲपद्वारे यूजर्सना त्यांचे डिजिटल सिग्नेचर त्यांच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करण्याची सुविधा मिळणार आहे. याशिवाय यूजर्सना या ॲपमध्ये अनेक विविध पद्धतींनी त्यांची सिग्नेचर तयार करण्याचा देखील पर्याय मिळणार आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
ॲपच्या मदतीने यूजर्स स्क्रीनवर हात ठेऊन सिग्नेचर तयार करू शकतात, आधीच्या सिग्नेचरचा फोटो अपलोड करू शकतात किंवा त्यांचे नाव टाईप करून विविध फॉन्ट स्टाईलमध्ये डिजिटल सिग्नेचर तयार करू शकतात. तसेच या ॲपमध्ये यूजर्सनाा विविध सिग्नेचर सेव्ह करण्याचा देखील पर्याय मिळणार आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि विविध ठिकाणी या डिजिटल सिग्नेचरचा वापर करू शकता.
जर तुमच्या फोनमध्ये जून 2026 चे गुगल प्ले सिस्टिम अपडेट इंस्टॉल असेल तर तुम्ही देखील गूगलच्या नवीन ॲपचा वापर करू शकता आणि हे गूगल ॲप तुमच्या फोनमध्ये इंस्टॉल करू शकता. यासाठी सेटिंगमध्ये जाऊन गुगल प्ले सिस्टिम अपडेट तपासा आणि नवीन अपडेट इंस्टॉल करा. आता तुम्ही गूगलचे नवीन ॲप तुमच्या फोनमध्ये इंस्टॉल करू शकता. या ॲपचा वापर करण्यासाठी तुम्हाला ॲक्टिव्हिटी लाँचर सारख्या ॲपची मदत घ्यावी लागणार आहे. इथे सिग्नेचर सर्च केल्यानंतर तुम्हाला यासंबंधित विविध पर्याय दिसणार आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे नवीन सिग्नेचर बनवू शकता आणि आधीपासूनच सेव्ह असलेले सिग्नेचर देखील मॅनेज करू शकता.
सध्या हे सिग्नेचर ॲप चाचणी टप्प्यात आहे आणि ते लवकरच यूजर्ससाठी लाँच केलं जाणार आहे. आता यूजर्स केवळ ॲपमध्ये सिग्नेचर बनवून सेव्ह करू शकतात, त्याला एडिट किंवा डिलीट करू शकतात आणि मॅनेज सिग्नेचर सेक्शनमध्ये जाऊन त्यांना मॅनेज करू शकतात. रिपोर्ट्सनुसार, हे सिग्नेचर ॲप काही गुगल पिक्सेल, सॅमसंग आणि वनप्लस स्मार्टफोनमध्ये दिसण्यास सुरुवात झाली आहे,






