mukhtar ansari

डॉक्टरांनी मुख्तारच्या शरीरातील पाच अवयवांचा व्हिसेरा जतन केला होता, जो नंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. आता पोलिसांनी हा व्हिसेरा तपासासाठी लखनौ येथील प्रयोगशाळेत पाठवला आहे.

  उत्तर प्रदेशचा माफिया मुख्तार अन्सारीचा (Mukhtar Ansari) तुरुंगात मत्यू झाल्यानंतर  30 मार्च रोजी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनं अनेक गुढ निर्माण केले असून अनेक प्रश्न उपस्थिच केले जात आहे. त्याचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमधून स्पष्ट झालं असलं तरी त्याच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, त्याला तुरुंगात ‘स्लो पॉयझन’ देण्यात आलं आहे. या पार्श्वभुमीवर आता मुख्तार अन्सारीचा व्हिसेरा (viscera) लखनऊच्या फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

  मख्तारच्या कुटुंबियाचा ‘हा’ आरोप

  माफिया मुख्तारच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुख्तारला ‘स्लो पॉयझन’ दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मुख्तारच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आता मुख्तार अन्सारीचा व्हिसेरा लखनऊच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे, जेणेकरून या प्रकरणात अधिक स्पष्टता आणता येईल. डॉक्टरांनी मुख्तारच्या शरीरातील पाच अवयवांचा व्हिसेरा जतन केला होता, जो नंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. आता पोलिसांनी हा व्हिसेरा तपासासाठी लखनौ येथील प्रयोगशाळेत पाठवला आहे.

  व्हिसेरा तपासणी कशी केली जाते?

  एखाद्याच्या मृत्यूनंतर, पोलिसांनी मृतदेहाचे पोस्टमार्टम केले, तर त्यादरम्यान, मृताच्या शरीरातून आंत, हृदय, मूत्रपिंड, यकृत इत्यादी अवयवांचे नमुने घेतले जातात, ज्याला व्हिसेरा म्हणतात. जर एखाद्या व्यक्तीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमागे पोलिस किंवा कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारचा संशय असल्यास, अशा प्रकरणांमध्ये मृत्यूचे कारण शोधण्यासाठी व्हिसेरा तपासला जातो.

  व्हिसेरा रासायनिक परीक्षकाद्वारे तपासला जातो. व्हिसेरा तपासून ते मृत्यू कसा झाला आणि मृत्यूचे कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न करतात? व्हिसेरा अहवाल न्यायालयात पुरावा म्हणून सादर केला जातो.