फोटो सौजन्य - Social Media
‘देऊळबंद 2’ सिनेमासाठी शाहरुख ठरला देवदूत!
एका मुलाखतीत प्रवीण तरडे सांगतो की, “आमच्या चित्रपटासाठी शाहरुख साहेबांनी मोठी मदत केली आहे. जेव्हा आमच्याकडे पैसे नव्हते तेव्हा त्यांच्या रेड चिलीजने तब्बल 42 लाखांचा बिल माफ केला. आम्हाला सिनेमाचा DCP काढायचा होता. आमचा बजेट 12 लाख होता. पण DCP केल्यावर तो खर्च 42 लाखांवर पोहचला, जे देण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते. त्यावेळी आम्ही रेड चिलीजला विनंती केली. ही बातमी शाहरुख सरांपर्यंत पोहचली. शाहरुख सरांनी सिनेमाबद्दल विचारपूस केली. सकारात्मक प्रतिकिया आल्यानंतर त्यांनी आम्हाला DCP देण्याची परवानगी दिली. इतकेच नव्हे तर 40 ते 50 टक्के बिल माफही केला.”
या मुलाखतीत प्रवीणने शाहरुखचे तसेच त्याच्या रेड चिलीज टीमचे विशेष आभार मानले आहेत. त्यावेळी प्रवीण म्हणाला, “मला शाहरुख यांना ‘देऊळबंद 2’ सिनेमा दाखवायचे आहे. आता माझा सिनेमा जरी 100 कोटींच्या जवळपास पोहचला असला तरी जेव्हा आमच्याकडे काही नव्हतं तेव्हा आमच्यासाठी खंबीरपणे उभे राहणारे आमचे शाहरुख खान सरच होते.”
सिनेमा लवकरच 100 कोटी करेल पार
‘देऊळ बंद २’ चित्रपटाची सध्याची तुफान घोडदौड पाहता हा सिनेमा लवकरच १०० कोटींचा टप्पा पार करेल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या २६ दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ₹८४.६५ कोटींची बंपर कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषकनुसार, चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद अजूनही उत्तम असून हा सिनेमा लवकरच १०० कोटींचा टप्पा गाठून नवीन विक्रम रचू शकतो.






