श्रीनगर : नदीमार्ग हत्याकांड प्रकरणाची (Kashmiri Pandit Murder Case) जवळपास १० वर्षानंतर पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. श्रीनगर उच्च न्यायालयाकडून २४ काश्मिरी पंडितांचं नदीमार्ग हत्याकांड प्रकरण (Nadigram Murder Case) पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. याआधी डिसेंबर २०११ ला या याचिकेवर न्यायमूर्ती संजय धर यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली होती. पण याप्रकरणी दाखल करण्यात आलेली पुनर्विलोकन याचिका फेटाळण्यात आली.
शोपियान जिल्ह्यातील नदीमार्ग गावात २००३ मध्ये २४ जणांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. या प्रकरणी शोपियानमधील जैनपोरा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. पण पुढे या नदीग्राम (Nadimarg) प्रकरणी सुनावणी झाली नाही. ही याचिकेचा अर्ज २०११ मध्ये शोपियानच्या सत्र न्यायालयातील न्यायाधीशांनी फेटाळला. अर्ज फेटाळण्याच्या आदेशाला फिर्यादी पक्षाने उच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि पुनर्निरिक्षण याचिका दाखल करण्यात आली. जम्मु आणि काश्मीरच्या उच्च न्यायलयात डिसेंबर २०११ मध्ये फेरविचार याचिका फेटाळून लावण्यात आली. याचिका मागे घेण्याचे आदेश देण्यात आले. पुनर्निरिक्षणाची याचिका सुनावणीशिवाय मंजूर करण्यात आली आणि वकिलांनी ते सादर केले जे कायद्याच्या दृष्टीने कायम नाही, असं फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
नदीग्राम हत्याकांड प्रकरण
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील नदीमार्ग गावात २३ मार्च २००३ ला २४ जणांची हत्या झाली. ही हत्या लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी केली होती. बनावट लष्करी युनिफॉर्म घातलेल्या दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील शोपियानजवळचं नदीमार्ग हे ठिकाण गाठलं. रात्री ११ च्या दरम्यान २४ जणांवर हल्ला झाला. यात अबाल वृद्धांचा समावेश होता. यात ११ पुरुष, ११ महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश होता. त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांनी त्यांचा कमांडर झिया मुस्तफा याच्या नेतृत्वाखाली हे हत्याकांड केलं. त्याला २००३ मध्ये अटक करण्यात आली होती. ऑक्टोबर २०२१ मध्ये मुस्तफाला पूंछच्या जंगलात दहशतवाद्यांचं लपण्याचं ठिकाण शोधण्यासाठी तुरुंगातून बाहेर आणण्यात आलं. दहशतवाद्यांशी झालेल्या कथित चकमकीत तो क्रॉस फायरिंगमध्ये मारला गेला.