Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi CJP Protest Live: जंतरमंतरवर राडा, इंटरनेट बंद, विद्यार्थी आक्रमक; CJPचा पोलिसांवर गंभीर आरोप

जंतर मंतर येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली पोलिसांनी राजधानीतील अनेक संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा वाढवली आहे. त्याचप्रमाणे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मेट्रो स्थानकांवरही खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 23, 2026 | 08:49 AM
Gen-Z नंतर आता पुन्हा दुसरे आंदोलन पेटले; मोर्चेकऱ्यांवर लाठीचार्ज, पाण्याचे फवारेही मारले

Gen-Z नंतर आता पुन्हा दुसरे आंदोलन पेटले; मोर्चेकऱ्यांवर लाठीचार्ज, पाण्याचे फवारेही मारले

Follow Us
Follow Us:

Delhi CJP Protest Live:  कॉकरोच जनता पार्टीच्या  २० जुलैच्या मोर्चानंतर आज (22 जुलै) रात्री साडेआठच्या दरम्यान जंतरमंतर पुन्हा मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठी चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर  दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतरही वातावरण तणावपूर्ण बनले आहे. कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) मुख्य प्रवक्ते आशुतोष रांका यांनी जंतरमंतर परिसरातील आज सकाळचे ताजे फोटो शेअर करत पोलिसांच्या कारवाईवर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे.

आशुतोष रांका यांनी सोशल मीडिया पोस्टमधून दिल्ली पोलिसांवर निशाणा साधला आहे. “काल दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरबाहेर प्रदर्शन करणाऱ्या आंदोलकांवर अत्यंत कठोर कारवाई केली. या भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून लोकांवर अमानुषपणे लाठीहल्ला करण्यात आला. तरीही, आज सकाळी जंतरमंतरवर आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.”

मोठी बातमी ! NEET परीक्षेबाबत केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण घोषणा; आता NEET परीक्षा…

धर्मेंद्र प्रधान राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच राहील: अभिजीत दिपके

सीजेपी प्रमुख अभिजित दीपक म्हणाले की, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत आणि धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही.

“We won’t call off our protest until our demands are met and Dharmendra Pradhan resigns.” : Abhijeet Dipke. pic.twitter.com/LqOTcuR881 — Cockroach Janta Party (@CJP_for_India) July 22, 2026

 

कालच्या राड्यानंतर आता जंतर मंतर येथे होणाऱ्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, दिल्ली मेट्रोची अनेक प्रमुख स्थानके आज सकाळी ७:३० पासून पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे, कार्यालय, महाविद्यालय किंवा इतर महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्यांनी घरातून निघण्यापूर्वी आपला मार्ग तपासावा.

आसाममध्ये मुसळधार पावसानंतर आता पुराचा तडाखा; आत्तापर्यंत 300 हून अधिक लोकांचा मृत्यू, जनजीवन विस्कळीत

कोणती मेट्रो स्थानके बंद राहणार?

दिल्ली मेट्रोनुसार, लोक कल्याण मार्ग, राजीव चौक, पटेल चौक, रामकृष्ण आश्रम मार्ग, बाराखंबा रोड, सुप्रीम कोर्ट, सेवा तीर्थ, जनपथ, मंडी हाऊस, सेंट्रल सेक्रेटरीएट, आयटीओ, दिल्ली गेट, इंद्रप्रस्थ, खान मार्केट, जोर बाग आणि शिवाजी स्टेडियम ही मेट्रो स्थानके सकाळी ७:३० पासून पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहतील.  राजीव चौक, मंडी हाऊस आणि सेंट्रल सेक्रेटरीएट स्थानकांवर प्रवाशांसाठी केवळ इंटरचेंज सुविधा उपलब्ध असेल. या स्थानकांवर प्रवेश आणि बाहेर पडण्यास परवानगी दिली जाणार नाही.

यापूर्वी, काल रात्री सुमारे ८ वाजेपर्यंत जंतर मंतरवरील आंदोलकांची संख्या ३,००० ते ४,००० पर्यंत वाढली होती आणि रात्री उशिरापर्यंत ती वाढतच राहिली. दरम्यान, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तेथे मोठ्या संख्येने “समाजकंटक” जमले होते. यापैकी काही आंदोलकांनी आधी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला आणि नंतर पोलिसांवर दगडफेक सुरू केली. त्यानंतर, हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.

या संघर्षात दोन एसीपी, दोन इन्स्पेक्टर आणि एका कॉन्स्टेबलसह पाच पोलीस जखमी झाले. अनेक आंदोलकही जखमी झाले. नवी दिल्लीतील जंतर मंतर, टॉल्स्टॉय मार्ग आणि पार्लमेंट मार्गावरील एनडीएमसी इमारतीसमोर जमाव जमला होता. सूत्रांनुसार, परिस्थिती शांत करण्यासाठी पोलिसांनी सीजेपी नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्याशी चर्चा केली, परंतु जमावाने त्यांचेही ऐकले नाही.

Web Title: National news delhi jantar mantar cjp protest fresh clash ashutosh ranka allegations internet ban

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 08:26 AM

Topics:  

  • abhijeet dipke
  • CJP Protest
  • Cockroach Janata Party
  • Delhi Police
  • national news

संबंधित बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी Gen Z सोबत साधणार संवाद; दिल्लीतील महाविद्यालयात चर्चा
1

पंतप्रधान नरेंद्र मोदी Gen Z सोबत साधणार संवाद; दिल्लीतील महाविद्यालयात चर्चा

‘ईडी’चा मोर्चा आता बोगस टोल वसूलीकडे; महाराष्ट्र, जम्मू, मध्य प्रदेशसह 7 राज्यांत छापेमारी
2

‘ईडी’चा मोर्चा आता बोगस टोल वसूलीकडे; महाराष्ट्र, जम्मू, मध्य प्रदेशसह 7 राज्यांत छापेमारी

Cockroach Janata Party News: सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशानंतर CJP ची मोठी माघार; ५ सप्टेंबरचा मोर्चा रद्द
3

Cockroach Janata Party News: सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशानंतर CJP ची मोठी माघार; ५ सप्टेंबरचा मोर्चा रद्द

Supreme Court On CJP March: दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोर्चाबाबत मोठी अपटेड; सुप्रीम कोर्टात मोठी खडाजंगी
4

Supreme Court On CJP March: दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोर्चाबाबत मोठी अपटेड; सुप्रीम कोर्टात मोठी खडाजंगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.