Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणुकीच्या तोंडावर BJP ला दणका! सुभाषचंद्र बोस यांच्या नातवाचा तृणमुलमध्ये प्रवेश; म्हणाले, “भारताला वाचवण्यासाठी…”

Chandra Kumar Bose join Trinamool Congress : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू असलेले चंद्र कुमार बोस यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 13, 2026 | 03:15 PM
Netaji Subhash Chandra Bose grandson Chandra Kumar Bose joins the Trinamool Congress

Netaji Subhash Chandra Bose grandson Chandra Kumar Bose joins the Trinamool Congress

Follow Us
Close
Follow Us:
  • सुभाषचंद्र बोस यांच्या नातवाचा तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश
  • चंद्र कुमार बोस य़ांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश
  • तृणमूल काँग्रेसचे खासदार कीर्ती आझाद यांच्या उपस्थितीत प्रवेश
 

Chandra Kumar Bose in Trinamool congress : कलकत्ता : भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लक्षवेधी भूमिका बजावणारे सुभाषचंद्र बोस यांच्या नातवाने नवीन राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीची (west bengal election) रणधुमाळी सुरु असताना चंद्र कुमार बोस यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या राजकीय प्रवेशाने चर्चांना उधाण आले आहे. राज्यमंत्री ब्रत्य बसू आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार कीर्ती आझाद यांच्या उपस्थितीत असताना चंद्र कुमार बोस यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश पार पडला.

 

सुभाषचंद्र बोस यांचे नातू असलेले चंद्र कुमार बोस हे यापूर्वी भाजपपक्षामध्ये होते. मात्र आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत भाजपवर जोरदार निशाणा साधला. तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर चंद्र कुमार बोस म्हणाले की, आज आपण पाहतो की भाजप विभाजनकारी राजकारण करते आणि जातीय द्वेष पसरवते. आता आपल्याला भारताला वाचवण्यासाठी लढावे लागेल आणि या विभाजनकारी राजकारणाला विरोध करावा लागेल.” अशी भूमिका त्यांनी घेतली.

हे देखील वाचा : UPI Wrong Transaction : चुकीच्या UPI ID वर पैसे ट्रान्सफर झाले? Undo बटण नसलं तरी पैसे परत मिळवणं शक्य

पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्षात सामील झाल्यावर चंद्र कुमार बोस म्हणाले की, भाजप नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आदर्शांचे पालन करत नाही. त्या पक्षात राहून नेताजींच्या आदर्शांनुसार काम करणे शक्यच नाही, अशी घणाघाती टीका चंद्र कुमार बोस यांनी केली.

चंद्र कुमार बोस 2016 मध्ये भाजपमध्ये सामील झाले आणि त्याच वर्षी त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भवानीपूरमधून विधानसभा निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक कोलकाता दक्षिणमधून लढवली, पण त्यातही त्यांचा पराभव झाला. 2023 मध्ये त्यांनी भाजप सोडला. आता 2026 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

हे देखील वाचा : “जर भाजप जिंकला, तर पश्चिम बंगालचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल?” अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं…

SIR मध्ये सुनावणीसाठी बोस यांना समन्स

भाजप सोडल्यानंतर लगेचच, चंद्र बोस तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होतील अशी अटकळ सुरू झाली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या अनेक कौतुकास्पद टिप्पणींनंतर या चर्चांना अधिकच जोर मिळाला. अलीकडेच, नेताजींच्या पणतवालाही एसआयआरकडून सुनावणीसाठी बोलावण्यात आले होते. या घटनेमुळे त्यानंतर राज्य राजकारणात एक वाद निर्माण झाला.

#WATCH कोलकाता, पश्चिम बंगाल: नेताजी सुभाष चंद्र बोस के परपोते चंद्र कुमार बोस TMC में शामिल हुए। pic.twitter.com/989JDB4fzo — ANI_HindiNews (@AHindinews) April 12, 2026

पश्चिम बंगालसाठी भाजपकडून साम-दाम-दंड-भेद

पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपची जोरदार तयारी सुरु आहे. मागील अनेक दिवसांपासून ममता बॅनर्जी यांना शह देण्यासाठी भाजप रणनीती आखत आहे. भाजपच्या पक्षश्रेष्ठींसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जोरदार प्रचार केला जात असून महिलांवर केंद्रीत असा प्रचार केला जात आहे. भाजपचा जाहीरनामा देखील प्रसिद्ध झाला असून यामध्ये आश्वासनांची खैरात वाटली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज देखील पश्चिम बंगालमधील मयुरेश्वर, दुबराजपूर आणि राणीगंज येथे तीन जाहीर सभा घेतील. यानंतर गृहमंत्री दुर्गापूरमध्ये रोड शो देखील करणार आहेत.

Web Title: Netaji subhash chandra bose grandson chandra kumar bose joins the trinamool congress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Mamata Banerjee
  • Netaji Subhash Chandra Bose
  • West bengal
  • west bengal election

संबंधित बातम्या

National News: देशातील आणखी एक मोठा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर; भाजप खासदाराचा खळबळजनक गौप्यस्फोट
1

National News: देशातील आणखी एक मोठा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर; भाजप खासदाराचा खळबळजनक गौप्यस्फोट

Detect, Delete, Deport : बंगाल सरकारच्या कडक भूमिकेमुळे बांगलादेशी घुसखोरांमध्ये दहशत; स्वत:च मायदेशी परण्यास तयार?
2

Detect, Delete, Deport : बंगाल सरकारच्या कडक भूमिकेमुळे बांगलादेशी घुसखोरांमध्ये दहशत; स्वत:च मायदेशी परण्यास तयार?

West Bengal Government : महिलांच्या खात्यात दरमहा ₹3000, फक्त 5 रुपयांत मासे-भात; ‘या’ सरकारची मोठी घोषणा
3

West Bengal Government : महिलांच्या खात्यात दरमहा ₹3000, फक्त 5 रुपयांत मासे-भात; ‘या’ सरकारची मोठी घोषणा

CM Suvendu Adhikari यांचा ममता बॅनर्जींना मोठा दणका; बकरी ईदच्या सुट्टीबाबत घेतला ‘हा’ निर्णय
4

CM Suvendu Adhikari यांचा ममता बॅनर्जींना मोठा दणका; बकरी ईदच्या सुट्टीबाबत घेतला ‘हा’ निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.