
नवी दिल्ली : आज सर्वोच्य न्यायालयात (Supreme Court) ओबीसी आरक्षण (OBC Reservation) यावर सुनावणी पार पडली, आणि राज्यातील ओबीसी समाजाचे आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळं ओबीसींना आता राजकीय आरक्षण मिळणार असून, आरक्षणासह राजकीय निवडणुका होणर आहेत, असा कोर्टानं निर्णय (Court result) दिला आहे. तसेच ओबीसी राजकीय आरक्षणासह निवडणुका घ्या असे आदेश कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला (State Election commission) दिले आहेत, तसेच लवकरच निवडणुकांच्या तारखा (Election date) सुद्धा जाहीर करा, असे आदेश सुद्धा न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. यानंतर आता राज्यातून राजकीय नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत, दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत (New Delhi Press Conference) ओबीसी आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे.
[read_also content=”एनटीसी गिरण्यांच्या प्रश्नावरील लढा व संघर्ष थांबणार नाही – सचिन अहिर https://www.navarashtra.com/maharashtra/the-fight-and-struggle-on-the-issue-of-ntc-mills-will-not-stop-sachin-ahir-306326.html”]
दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आजच्या निकालावरुन समाधान व्यक्त केले आहे. राज्यातील ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे हीच भूमिका युती सरकारची होती. त्यासाठी, आम्ही वेळोवेळी दिल्लीतील तज्ज्ञांशी चर्चा केली, बैठका घेतल्या. तसेच आम्ही सातत्याने बांठीया आयोगाशी संपर्कात होतो. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही दिल्लीत या कामासाठी तीन वेळा गेलो. ओबीसी आरक्षणासंदर्भात आम्हाला क्रेडिट नको आहे. आज जे श्रेय घेत आहे ते बांठीया आयोगाच्या विरोधात होते. असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, नवीन सरकारचा पायगुण ओबीसी समाजासाठी चांगला आहे. म्हणून, आज ओबीसी समाजाच्या बांठिया आयोगाच्या शिफारसी सर्वोच्च न्यायालयाने स्विकारल्या आहेत. त्यामुळे, निवडणुकीत ओसीबी समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या आरक्षणासाठी मदत करणाऱ्या, प्रयत्न करणाऱ्या तसेच यासाठी वेळोवेळी सहाकार्य करणाऱ्याचं सर्वांचं मी आभार मानतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच या निर्णयामुळं ओबीसी समाजाला न्याय मिळे असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटले.