दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (DMRC) मोठा निर्णय घेतला आहे. डीएमआरसीने प्रवाशांना दोन दारूच्या बाटल्या (liquor bottle) घेऊन प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. डीएमआरसीने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, दिल्ली मेट्रोचे नियम बदलण्यात आले आहेत. विमानतळ एक्सप्रेस लाइनच्या तरतुदींनुसार, दिल्ली मेट्रोमध्ये आता प्रति व्यक्ती दोन सीलबंद दारूच्या बाटल्यांना परवानगी आहे. CISF आणि DMRC अधिकाऱ्यांच्या समितीने पूर्वीच्या आदेशाचे पुनरावलोकन केले आहे.
[read_also content=”कोल्ड्रिंक पिताना काळजी घ्या! त्यामध्ये कॅन्सर निर्माण करणारं रसायन aspartame तर नाही ना? WHO लवकरच देणार इशारा https://www.navarashtra.com/india/isnt-aspartame-a-cancer-causing-chemical-who-will-issue-a-warning-soon-425395.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत विमानतळाच्या मार्गावरच दारूची सीलबंद बाटली घेऊन जाण्याची परवानगी होती. बाकीच्या ठिकाणी बाटली नेण्यास बंदी होती. आता हा नवा आदेश सर्व मेट्रो मार्गांवर लागू होणार आहे. मात्र, मेट्रोच्या परिसरात दारू पिण्यास बंदी असेल. प्रवाशांना विशेष आवाहनही करण्यात आले आहे. तसेच, डीएमआरसीने म्हटले आहे की, प्रवास करताना योग्य शिष्टाचार ठेवा. दारूच्या नशेत कोणताही प्रवासी गैरवर्तन करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
दिल्ली मेट्रो दररोज हजारो प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते. ऑफिसला जाणाऱ्यांसाठी दिल्ली मेट्रो वरदानापेक्षा कमी नाही. अशा परिस्थितीत DMRC ने प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक नियम आणि कायदे केले आहेत. अनेक वेळा प्रवासी ट्विटर आणि इतर सोशल मीडिया साइट्सवर दिल्ली मेट्रोच्या नियमांबाबत प्रश्न विचारत असतात. गुरुवारीही एका युजरने दारूबाबत प्रश्न विचारला होता, त्यानंतर डीएमआरसीच्या ट्विटर हँडलने याची पुष्टी केली. डीएमआरसीने सांगितले की, होय, दिल्ली मेट्रोमध्ये 2 सीलबंद दारूच्या बाटल्या घेऊन जाण्याची परवानगी आहे.
Hi. Yes 2 sealed bottles of alcohol is allowed in Delhi Metro.
— Delhi Metro Rail Corporation I कृपया मास्क पहनें? (@OfficialDMRC) June 30, 2023
दिल्लीत दारूच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. 2022 च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत या वर्षी दारूच्या किरकोळ व्यवसायात मोठी घसरण झाली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेव्हरेज कंपनी (CIABC) च्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. वृत्तसंस्थेनुसार, दिल्लीतील केजरीवाल सरकारने 17 नोव्हेंबर 2021 रोजी नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केले. या धोरणाच्या अंमलबजावणीनंतर जानेवारी-मार्च (2022) मध्ये मद्यविक्रीत 263% वाढ झाली आहे. तथापि, मद्य धोरणात घोटाळा झाल्याच्या आरोपानंतर जुलै 2022 मध्ये नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी ते मागे घेतले होते.