Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणूक आयोगाने जारी केलेली मतदानाची आकडेवारी संशयास्पद; विरोधी पक्ष आज घेणार राष्ट्रपतींची भेट

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha) पहिला आणि दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाची आकडेवारी भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केली. मात्र, आता या आकडेवारीवर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. मतदानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात 66 टक्के मतदान झाले असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 09, 2024 | 08:37 AM
निवडणूक आयोगाने जारी केलेली मतदानाची आकडेवारी संशयास्पद; विरोधी पक्ष आज घेणार राष्ट्रपतींची भेट
Follow Us
Follow Us:

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha) पहिला आणि दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाची आकडेवारी भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केली. मात्र, आता या आकडेवारीवर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. मतदानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात 66 टक्के मतदान झाले असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. हीच आकडेवारी संशयास्पद असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यावरून आज विरोधी पक्षातील सर्व नेते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांची भेट घेणार आहेत.

देशामध्ये 19 एप्रिल रोजी 102 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडले. त्यावेळी संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुमारे 60 टक्के मतदान झाले असल्याचे निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. तर 26 एप्रिल रोजी देशातील दुसरा टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. या वेळी 88 मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया झाली. तर याच दिवशी 61 टक्के मतदान झाले असल्याचे आयोगाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र, या पहिल्या टप्प्यातील मतदानाला दहा दिवस झाल्यानंतर तसेच दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला तीन दिवस झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या वतीने अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली.

या अंतिम आकडेवारीनुसार, पहिल्या टप्प्यामध्ये 66.14 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाच्या वतीने सांगण्यात आले. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 66.71 टक्के मतदान झाले असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. मतदानाच्या दिवशी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार यात तब्बल 6 टक्क्यांची वाढ झाली आहे. ही आकडेवारी संशयास्पद वाटत असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षातील सर्व नेते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन या विषयी तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Opposition parties leaders will meet the president droupadi murmu today about suspect voting nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2024 | 08:37 AM

Topics:  

  • indian politics
  • Lok Sabha Election
  • Lok Sabha Voting
  • maharashtra

संबंधित बातम्या

FDA चा औषध माफियांना दणका! ६ महिन्यांत ४,७२३ तपासण्या, १,५८१ परवान्यांवर कारवाई; १५ जणांना अटक
1

FDA चा औषध माफियांना दणका! ६ महिन्यांत ४,७२३ तपासण्या, १,५८१ परवान्यांवर कारवाई; १५ जणांना अटक

Mangal Prabhat Lodha: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी! रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी वनस्टेप फाउंडेशन आणि NSDC सोबत सामंजस्य करार
2

Mangal Prabhat Lodha: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी! रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी वनस्टेप फाउंडेशन आणि NSDC सोबत सामंजस्य करार

Shiv Sena Protest: ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा…’ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!
3

Shiv Sena Protest: ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा…’ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई
4

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.