भारतातून इंग्रजांनी किती पैसा लुटला? आकडा ऐकाल तर चक्रावून जाल, रिपोर्टमघून धक्कादायक माहिती समोर
Oxfam Report : भारताची ओळख कधी काळी सोने की चिडिया अशी होती. मात्र इंग्रजांनी भारतात पाय रोवले आणि १५० वर्ष भारत पारतंत्र्यात गेला. या काळात इंग्रजांनी भारतात प्रचंड लूट केली. ही लूट किती होती याचा अंदाज आजपर्यंत मांडला जात आहे. मात्र आता एक अहवाल समोर आला आहे. यात भारतातून इंग्रजांनी किती संपत्ती लूटन नेली असेल याचा अंदाज मांडला आहे. ऑक्सफॅम या संस्थेच्या नव्या अहवालानुसार इंग्रजांनी भारतातून तब्बल 64.82 खर्व अमेरिकी डॉलर एवढ्या अफाट संपत्तीची लूट केल्याचं म्हटलं आहे.
Richest 10% Took Over Half of $64.82 Trillion Extracted by UK From India: New Oxfam Report The UK extracted a staggering $64.82 trillion from India during colonial rule (1765–1900), with $33.8 trillion—more than half—benefiting the richest 10%, according to Oxfam International’s… pic.twitter.com/JD2beVGl64 — The Asian Chronicle (@AsianChronicle) January 20, 2025
ऑक्सफॅमच्या अहवालानुसार, इंग्रजांनी भारतातून इतकी अफाट लूट केली आहे की, या संपत्तीतून लंडनला 50 ब्रिटिश पौंडच्या नोटांनी चारवेळा झाकून ठेवता येऊ शकते. जगभरातील असमानतेचे चित्र मांडण्यात आलेला हा अहवाल सोमवारी प्रसिध्द करण्यात आला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या एक दिवस आधी हा अहवाल दरवर्षी प्रकाशित केला जातो. यात अनेक अभ्यास आणि संशोधनांचा हवाला देण्यात आला आहे. यातील 33.8 खर्व डॉलर एवढा पैसा इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत लोकांकडे पोहचला. या लोकांचे प्रमाण त्यावेळच्या इंग्लंडच्या लोकसंख्येच्या केवळ 10 टक्के होते. या लोकांकडील संपत्तीचं श्रेय गुलामी आणि वसाहतवादाला दिले जाते.
1750 मध्ये आंतरराष्ट्रीय औद्योगिक उत्पादनात भारताचे योगदान जवळपास 25 टक्के होते. 1900 पर्यंत हा आकडा वेगाने कमी होत 2 टक्क्यांपर्यंत खाली आला. आशियाई वस्त्र उद्योगाविरोधात ब्रिटनची संरक्षणवादी धोरणे त्यास कारणीभूत होती.1875 मध्ये भारतामध्ये सर्वाधिक पैसा कमावणारे लोक प्रामुख्याने सैन्यदल आणि प्रशासनात अधिकारी होते. पण 1940 पर्यंत व्यापारी, बँकर आणि उद्योगपती असा नवा वर्ग निर्माण झाला आणि त्यांच्याकडेच अधिक पैसा एकवटला.
IIT Baba : IIT बाबाची जुना आखाड्यातून हकालपट्टी; मोठं कारण आलं समोर
अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांही वसाहतवादातून उदय झाला. त्यांचे नेतृत्व ईस्ट इंडिया कंपनी सारख्या कंपन्यांनी केलं. या कंपन्या स्वत:च एक कायदा बनल्या आणि त्यांनी वसाहतवादादरम्यान अनेक गुन्हे केले. आजही बहुराष्ट्रीय कंपन्यांची एकाधिकारशाही आहे. ऑक्सफॅमच्या अहवालात वसाहतवादावर कठोर भाष्य करण्यात आलं आहे.






