रेल्वेत प्रवाशांनी मृतदेहासोबत केला प्रवास; भीतीने प्रवासी रात्रभर जागेच, कुणीही मदतीला आलं नाही!

चेन्नईहून हजरत निजामुद्दीनला जाणाऱ्या तामिळनाडू संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये प्रवाश्यांनी नागपूरहून झाशीला मृतदेह घेऊन प्रवास केला.

  प्रवासादरम्यान अनेकदा काही मजेशीर गोष्टी घडत असतात. अनेकदा प्रवाशांमध्ये क्षुल्लक कारणावरुन भांडण होतं, तर कधी अडचणीत असलेल्या प्रवाशांना सहप्रवाशी मदत करतानाही आपल्याला दिसतात. मात्र, यावेळी रेल्वे प्रवासात असं काही भितीदायक घडलं ज्यामुळे प्रवाशांना रात्रभर जागून प्रवास करावा लागला. तामिळनाडू संपर्क क्रांती एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात प्रवाशांनी चक्क मृतदेह घेऊन 600 किमीचा प्रवास केला. (Passengers Traveled With Dead body) यावेळी भीतीने प्रवाशांची घाबरगुंडी उडाली त्याामुळे प्रवाशांनी मृतदेह बाहेर काढण्याची विनंती अधिकाऱ्यांना केली. पण कोणीही त्याचं  ऐकलं नाही. त्यामुळे त्यांना नाईलाजाने मृतदेहासोबतच प्रवास करावा लागला.

  नेमका काय प्रकार?

  चेन्नईहून हजरत निजामुद्दीनला जाणाऱ्या तामिळनाडू संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये तामिळनाडू संपर्क क्रांती एक्स्प्रेसच्या अनारक्षित डब्यातील एका प्रवाशाचा अचानक डोकेदुखीमुळे मृत्यू झाला. ट्रेन झाशीला पोहोचल्यावर मृतदेह बाहेर काढण्यात आला. यावरून प्रवाशांमध्ये खळबळ उडाली होती. 600 किमीच्या लांबच्या प्रवासात मृतदेह पाहून प्रवासी घाबरले. प्रवाशांनी भोपाळ स्थानकावरील रेल्वे अधिकाऱ्यांना मृतदेह काढण्याची विनंती केली, मात्र कोणीही ऐकले नाही. त्यामुळे प्रवाशांनी आहे त्या परिस्थितीत प्रवास करावा लागला. रेल्वे झाशीला पोहोचल्यावर मृतदेह ट्रेनमधून बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला.

  रात्रभर प्रवासी जागे

  रामजीत मुलगा भैयालाल हा त्याच्या मेव्हणा गोवर्धनसह रविवारी तामिळनाडू संपर्क क्रांती एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात चेन्नईहून झाशीला येत होता. रविवारी रात्री 2.44 वाजता ही ट्रेन नागपूरला पोहोचली. ट्रेनला इथे 15 मिनिटांचा थांबा होता. यादरम्यान रामजीतला अचानक डोकेदुखी सुरू झाली आणि तो सीटवरून खाली पडला. भावजय गोवर्धन आणि इतर प्रवाशांनी रामजीतला उचलून नेले तेव्हा त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांना दिसले. यानंतर डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये घबराट पसरली.

  त्याने मदतीसाठी रेल्वे रेल्वे हेल्पलाइनवर फोन केला मात्र मदत मिळाली नाह.  यानंतर प्रवाशांनी रामजीतचा मृतदेह सीटवर ठेवला. रात्रभर प्रवासी डब्यात मृतदेह असल्याच्याच्या भीतीने अनेक प्रवाशांना रात्रभर झोप लागली नाही. सोमवारी दुपारी 12.30 वाजता ट्रेन झाशीला पोहोचली तेव्हा  मृतदेह खाली उतरवण्यात आला.