प्रयागराज महाकुंभमेळ्यामध्ये महिलांचे स्नान करताना फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत (फोटो - istock)
प्रयागराज : उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमध्ये महिनाभरापासून महाकुंभमेळा सुरु आहे. 144 वर्षांनंतर होणाऱ्या या महाकुंभमेळ्यासाठी जगभरातून भाविक येत आहेत. कोट्यवधी भाविकांनी अमृत स्नान करुन या सोहळ्यामध्ये सहभाग घेतला आहे. मात्र महाकुंभमेळ्यातील व्यवस्थापनावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. महिलांच्या गोपनीयतेशी संबंधित मुद्दा सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी उपस्थित केला आहे. यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे.
प्रयागराजमधील संगमावर स्नान करण्यासाठी पुरुषांसह महिलांची देखील मोठी संख्या आहे. कुंभमध्ये स्नान केल्यानंतर महिलांना कपडे बदलण्यासाठी जागा करण्यात आली आहे. मात्र संगम येथे महिलांनी आंघोळ करताना आणि कपडे बदलतानाचे फोटो आणि व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केले जात धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. महिलांचे ते व्हिडिओ अश्लील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विकले जात आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महाकुंभमेळा परिसरातील पोलीस सक्रिय झाले आहेत. बुधवारी एका इन्स्टाग्राम अकाउंटविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप
महाकुंभमेळ्यातील स्नान करताना महिलांचे खाजगी व्हिडिओ डार्क वेबवर विकले जात आहेत. याप्रकरणावर सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करुन अखिलेश यादव यांनी खडेबोल सुनावले आहेत. त्यांनी लिहिले आहे की, “महाकुंभात महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे, ही अत्यंत अशोभनीय आणि संवेदनशील बाब आहे. महाकुंभात पुण्य मिळवण्यासाठी आलेल्या महिला शक्तीचे फोटो उघडपणे विकल्याच्या वृत्तामुळे भाविकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. महिलांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. या ऑनलाइन विक्रीतून जीएसटी मिळवून सरकार या बेकायदेशीर कृत्यात भागीदार होत नाही का? उत्तर प्रदेश आणि राष्ट्रीय महिला आयोगाने तात्काळ दखल घ्यावी आणि सक्रिय व्हावे आणि जबाबदार असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करावी. पूर्णपणे निषेधार्ह!” असे स्पष्ट मत अखिलेश यादव यांनी व्यक्त केले आहे.
ये एक अति अशोभनीय एवं संवेदनशील मामला है कि महाकुंभ में नारी के मान-सम्मान की रक्षा करने में भाजपा सरकार विफल रही है। महाकुंभ में पुण्य कमाने आई स्त्री शक्ति की तस्वीरों के सरेआम बेचे जाने के समाचार पर श्रद्धालुओं में भारी आक्रोश है। नारी की गरिमा की सुरक्षा करना सरकार का कर्तव्य… pic.twitter.com/ew8uD9XQxX
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) February 19, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी गंभीर आरोप केल्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस ॲक्शनमोडमध्ये आले आहेत. उत्तर प्रदेश पोलीसांनी महाकुंभात स्नान करणाऱ्या महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट आणि विक्री केल्याच्या आरोपाखाली दोन सोशल मीडिया अकाउंट्सविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १९ फेब्रुवारी रोजी नोंदवलेल्या दुसऱ्या प्रकरणात, एका टेलिग्राम चॅनलने असेच व्हिडिओ विक्रीसाठी दिल्याचे आढळून आले. या चॅनलविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की त्यांनी अकाउंट ऑपरेटरची ओळख पटविण्यासाठी इंस्टाग्रामची मालकी आणि ऑपरेट करणारी तंत्रज्ञान कंपनी मेटाकडून माहिती मागितली आहे आणि तपशील प्राप्त झाल्यानंतर अटकेसह कारवाई केली जाईल, अशी माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली आहे.