प्रयागराजमध्ये कोल्ड स्टोरेज इमारत कोसळली (फोटो- istockphoto)
प्रयागराजमध्ये कोल्ड स्टोरेजची इमारत कोसळली
पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत व्यक्त केला शोक
कोल्ड स्टोरेजच्या इमारतीखाली अनेक जन अडकल्याची भीती
Prayagraj Cold Storage Collasped: उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रयागराजमध्ये कोल्ड स्टोरेजची इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत इमारतीच्या ढीगाऱ्याखाली अनेक जण अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. तसेच आर्थिक मदत देखील जाहीर केली आहे.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे झालेल्या घटनेमुळे मी व्यथित झालो आहे. या कठीण प्रसंगी त्या घटनेत अडकलेल्या लोकांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करतो. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ?
प्रयागराजमध्ये घडलेल्या घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले आहे. प्रयागराज येथे कोल्ड स्टोरेज इमारत कोसळण्याची घटना हृदयद्रावक आहे. शोकाकुल कुटुंबीयांप्रति माझ्या संवेदना आहेत. जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आणि जखमींवर योग्य उपचार सुनिश्चित करण्याचे निर्देश मी दिले आहेत.
जनपद प्रयागराज के कोल्ड स्टोरेज में हुई दुर्घटना में जनहानि अत्यंत दुःखद एवं हृदय विदारक है। मेरी संवेदनाएं शोक संतप्त परिजनों के साथ हैं। इस दुर्घटना में दिवंगत हुए लोगों के परिजनों को ₹02-02 लाख की आर्थिक सहायता प्रदान करने तथा जिला प्रशासन के अधिकारियों को घायलों को तत्काल… — Yogi Adityanath (@myogiadityanath) March 23, 2026
प्रयागराजमध्ये कोल्ड स्टोरेज इमारत कोसळली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलिस व स्थानिक प्रशासन दाखल झाले आहे. अत्यंत वेगाने मदतकार्य राबवले जात आहे. ढीगाऱ्याखाली अनेक कामगार अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अतिशय वेगाने बचावकार्य केले जात आहे.






