पंतप्रधान मोदींची कॉँग्रेसवर टीका (फोटो- ट्विटर)
1. नरेंद्र मोदी आज अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर
2. हजारो कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण
3. कॉँग्रेसवर केली जोरदार टीका
PM Modi visit Arunachal Pradesh: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्वोत्तर राज्यांच्या दौऱ्यावर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुणाचल प्रदेश राज्याच्या दौऱ्यावर होते. अरुणाचल प्रदेशमध्ये नरेंद्र मोदी यांनी दोन महत्वाच्या जलविद्युत प्रकल्पांचे लोकार्पण केले. यावेळी मोदी यांनी नागरिकांना संबोधित देखील केले. त्यावेळी तयांनी कॉँग्रेसवर जोरदार टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशमधून कॉँग्रेसवर टीका केली आहे. कॉँग्रेसच्या सरकारने अरुणाचल प्रदेश आणि पूर्वेकडील राज्यांना कधीच काही देऊ केले नाही. तर भाजप सरकारने 10 वर्षांमध्ये विकासाला प्राथमिकता दिली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये प्रचंड प्रमाणात जलविद्युत शक्ती आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये दोन मोठ्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली.
महाराजा अग्रसेन जी की जयंती पर उन्हें सादर नमन। उनका संपूर्ण जीवन सामाजिक न्याय और एकता का प्रतीक है। सद्भावना और आपसी भाईचारे का उनका संदेश देशवासियों को सदैव प्रेरित करता रहेगा।
— Narendra Modi (@narendramodi) September 22, 2025
नागरिकांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “अरुणाचल प्रदेश राज्य हे केवळ उगवत्या सूर्याची भूमी नाही तर देशभक्तीच्या उगवत्या भावनेची भूमी आहे. या ठिकाणी लोकसभेच्या दोनच जागा असल्याने कॉँग्रेस सरकारांनी अरुणाचल प्रदेशकडे दुर्लक्ष केले. दोनच जागा आहेत तर, या भागाकडे का लक्ष द्यायचे असे विचार कॉँग्रेस सरकार करत. 2014 च्या आधी 10 वर्षांमध्ये कॉँग्रेस सरकारने केवळ 6 हजार कोटी टॅक्स फंडच्या स्वरूपात अरुणाचल प्रदेशला दिले.”
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आमच्या सरकारची प्रेरणा वोट बँक नव्हे तर, राष्ट्र प्रथम ही आहे. भाजप पूर्वेकडील आठही राज्यांना ‘अष्टलक्ष्मी’च्या रूपात पाहते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटानगर येथे लहान व्यापऱ्यांशी देखील संवाद साधला आहे. तसेच नेक्स्ट जनरेशन जीएसटीबाबत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.
भारतानं स्वावलंबी असावं’; पंतप्रधान मोदींचे आवाहन
खऱ्या अर्थाने, जर आपला कोणी शत्रू असेल तर तो म्हणजे इतर देशांवरील आपले अवलंबित्व…हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे आणि आपण एकत्रितपणे भारताच्या या शत्रूला पराभूत केले पाहिजे. परकीय अवलंबित्व जितके जास्त असेल तितकेच देशाचे अपयशही जास्त असेल. जगातील शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी…जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या देशाने स्वावलंबी बनले पाहिजे. ‘चिप असो वा शिप’ सर्व देशातच बनावं.
‘चिप असो वा शिप’ सर्व देशातच बनावं, भारतानं स्वावलंबी असावं’; पंतप्रधान मोदींचे आवाहन
आपण 1.4 अब्ज देशवासियांचे भविष्य इतरांवर किंवा त्यांच्या अवलंबित्वावर सोडू शकत नाही. भावी पिढ्यांचे भविष्य पणाला लावता येणार नाही. 100 समस्यांवर एकच इलाज आहे आणि तो म्हणजे स्वावलंबी भारत. म्हणून, आपण आव्हानांना तोंड दिले पाहिजे आणि भारताने स्वावलंबी होऊन जगासमोर उभे राहिले पाहिजे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.