देशात जातिनिहाय जनगणना करण्याचा मोदी सरकारचा निर्णय (फोटो- सोशल मिडिया)
नवी दिल्ली: आज केंद्र सरकारची कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत पाकिस्तानबाबत काही मोठा निर्णय होतो का याची उत्सुकता सर्वांना लागली होती. मात्र आज झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने सर्वात मोठी घोषणा केली आहे. देशभरात जातिनिहाय जनगणना करण्याची घोषणा मोदी सरकारने केली आहे. केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांनी याबद्दल माहिती दिली.
भारतात दहा वर्षांनी जातिनिहाय जनगणना केली जाते. त्यानुसार 2021 मध्ये जनगणना होणे अपेक्षित होते. मात्र त्यावेळेस करोना संसर्ग असल्याने जातिनिहाय जनगणना करण्यात आली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार जातीच्या गणणेचा जातिनिहाय जनगणणेत समावेश केला जाईल असे अश्विनी वैष्णव म्हणाले.
मोदी सरकारने जातिनिहाय जनगणनेचा घेतलेला हा निर्णय बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधीच मोठा निर्णय समजला जात आहे. 1947 नंतर देशात जातिनिहाय जनगणना करण्यात आलेली नाही. कॉँग्रेसने जातिनिहाय जगणणेऐवजी जातिनिहाय सर्वेक्षण केले, अशी टीका मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कॉँग्रेसवर केली आहे.
पहलगामबाबत काय निर्णय?
आजच्या केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा निनरया होईल अशी शक्यता होती. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्यामुळे आजच्या बैठकीत पहलगाम हल्ल्याबाबत काहीतरी निर्णय होईल असे वाटत होते. मात्र केंद्र सरकारने जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रातील तरुणाने केला धक्कादायक खुलासा
हलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला एक आठवडा पूर्ण झाला आहे. या हल्ल्यासंदर्भात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. भारत सरकार आक्रमकपणे पावले उचलत आहे. त्यातच आता महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यातील एक युवकाने मोठा गौप्यस्फोट केला आहे. पहलगाम हल्ल्यातील संशयित प्रकरणातील हल्लेखोराने हल्ल्याच्या एक दिवस आधी माझ्याशी बोलले असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.
जालना जिल्ह्यातील आदर्श राऊत यांनी 21 एप्रिल रोजी बैसरन खोऱ्यात झालेल्या हल्याबबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. एक फूड स्टॉलवर झालेल्या संभाषणाबाबत भाष्य केले आहे. यावेळेस आदर्श राऊत म्हणाले की एका व्यक्तीने मला हिंदू आहेस का? काश्मीरचा दिसत नाहीस असे विचारले होते. पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचे स्केच जारी केले होते. त्यातील एकाने हे प्रश्न विचारले असल्याचे राऊत यांचे म्हणणे आहे.
आदर्श राऊत यांच्या म्हणण्यानुसार, 21 एप्रिल रोजी ते पहलगाम येथे घोडेस्वारी करण्यासाठी आले होते. त्यावेळेस ते एका मॅगी स्टॉलवर थांबले होते. तेव्हा एक माणूस त्यांच्याजवळ आला आणि त्याने मला हिंदू आहे का असे विचारले. तसेच तुम्ही काश्मिरी दिसत नसल्याचे देखील तो म्हणाला. त्यानंतर तो व्यक्ती त्याच्या साथीदाराकडे वळून आज गर्दी कमी असल्याचे म्हणाला.