पहलगाम हल्ल्याबाबत महाराष्ट्रातील तरुणाचा मोठा खुलासा (फोटो- सोशल मिडिया)
जालना: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला एक आठवडा पूर्ण झाला आहे. या हल्ल्यासंदर्भात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. भारत सरकार आक्रमकपणे पावले उचलत आहे. त्यातच आता महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यातील एक युवकाने मोठा गौप्यस्फोट केला आहे. पहलगाम हल्ल्यातील संशयित प्रकरणातील हल्लेखोराने हल्ल्याच्या एक दिवस आधी माझ्याशी बोलले असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.
जालना जिल्ह्यातील आदर्श राऊत यांनी 21 एप्रिल रोजी बैसरन खोऱ्यात झालेल्या हल्याबबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. एक फूड स्टॉलवर झालेल्या संभाषणाबाबत भाष्य केले आहे. यावेळेस आदर्श राऊत म्हणाले की एका व्यक्तीने मला हिंदू आहेस का? काश्मीरचा दिसत नाहीस असे विचारले होते. पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचे स्केच जारी केले होते. त्यातील एकाने हे प्रश्न विचारले असल्याचे राऊत यांचे म्हणणे आहे.
आदर्श राऊत यांच्या म्हणण्यानुसार, 21 एप्रिल रोजी ते पहलगाम येथे घोडेस्वारी करण्यासाठी आले होते. त्यावेळेस ते एका मॅगी स्टॉलवर थांबले होते. तेव्हा एक माणूस त्यांच्याजवळ आला आणि त्याने मला हिंदू आहे का असे विचारले. तसेच तुम्ही काश्मिरी दिसत नसल्याचे देखील तो म्हणाला. त्यानंतर तो व्यक्ती त्याच्या साथीदाराकडे वळून आज गर्दी कमी असल्याचे म्हणाला.
नेटवर्क प्रॉब्लेम असल्याने मी मॅगी स्टॉलच्या मालकाला पैसे देऊ देऊ शकलो नाही. मी त्याचा मोबाइल नंबर घेतला आणि खाली नेटवर्कमध्ये आल्यावर त्याचे पैसे पाठवले. ही माहिती एनआयएला आदर्श राऊत यांनी दिल्याचे समजते आहे. मात्र अजून एनआयएने त्यांना संपर्क केला नाही. जर त्यांना काही माहिती हवी असल्यास मी देईन असे आदर्श राऊत यांचे म्हणणे आहे.
पहलगाम हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर भारत सरकारने अनेक धोरणात्मक निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी केली आहे. सिंधु जल करार स्थगित केला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत महत्वाची बैठक घेत भारतीय सुरक्षा दलांना फ्री हँड दिला आहे.
मोदींकडून सैन्याला फ्री हँड, पाकिस्तानमध्ये घबराट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या महत्वाच्या बैठकीत तीनही सैन्याचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाला देखील उपस्थित होते. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते. यावेळेस अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली आहे.
आज काहीतरी मोठं घडणार! आपल्याकडे वेळ कमी अन्…; PM मोदींकडून सैन्याला फ्री हँड, पाकिस्तानमध्ये घबराट
या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्य दलांवर पूर्ण विश्वास दर्शवला आहे. तर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी योग्य वेळ, तारीख तुम्हीच सेट करा असे निर्देश देखील पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत. त्यामुळे आता लष्कराला कारवाईसाठी पूर्ण मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे आता भारतीय सैन्य दले कोणती कारवाई करणार आणि पाकिस्तान त्याला कसे प्रत्युत्तर देणार हे येत्या काळात पहावे लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला खुली सूट दिली आहे. पाकिस्तानला धडा शिकवणे हेच आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये सैन्याने वेळ आणि टार्गेट ठरवावे. त्यात कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही. या बैठकीनन्यत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. मोदी आणि शहा यांच्यात महत्वाची बैठक होत आहे. त्यामुळे आज काहीतरी मोठा निर्णय होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.