दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा महानिकाल आज जाहीर होत आहे. यामध्ये एनडीए आघाडी विरुद्ध इंडिया आघाडी अशी चुरशीची लढत होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान मोजणी सुरु झाली आहे. देशभरासह राज्यातील लोकसभा मतदारसंघाचा कल समोर येत आहे. यामध्ये राज्यामध्ये आश्चर्यकारक निर्णय आणि एक्झिट पोलनुसार देखील निर्णय समोर येत आहे. यंदाचा निकाल देशाचे राजकीय महत्त्व ठरवणारा असल्यामुळे काटे की टक्कर दिसून येत आहे. देशातमध्ये नरेंद्र मोदी यांचा वाराणसी तर राहुल गांधी यांचा वायनाड व रायबरेली हे मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये आकडेवारी समोर आली आहे.
लोकसभा निवडणूकीमध्ये वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी यांची चुरशीची लढत दिसून येत आहे. नरेंद्र मोदी हे सकाळी पिछाडीवर गेले होते. नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये कॉंग्रेसचे नेते अजय राय हे निवडणूक लढत आहेत. सकाळी पहिल्या फेरीमध्ये अजय राय हे 6223 मतांनी आघाडीवर होते. नरेंद्र मोदी हे पहिल्या फेरीमध्ये नरेंद्र मोदी पिछाडीवर गेल्यामुळे भाजपच्या सर्व सर्वांना घाम फुटला होता. मात्र नरेंद्र मोदी यांनी त्यांची आकडेवारी भरुन काढली आहे. सध्या वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी हे आघाडीवर आहेत.
राहुल गांधी व अमित शाह हजारोंच्या मतांनी आघाडीवर
नरेंद्र मोदीबरोबर भाजप नेते अमित शाह यांनी देखील मतदानाच्या आकडेवारीमध्ये मोठी मजल मारली आहे. अमित शाह हे महत्त्वाचे भाजप नेते असून ते विद्यमान मंत्री आहेत. अमित शाह यांचा गांधीनगर हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे. गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगरमध्ये अमित शाह यांनी मोठी आकडेवारी गाठली आहे. अमित शाह यांनी गांधीनगरमध्ये तब्बल 75 हजार मतांची आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर राहुल गांधी यांनी देखील आपला मतदारसंघ जोरदार राखला आहे. राहुल गांधी देखील वायनाड व रायबरेलीया मतदारसंघामध्ये आघाडीवर आहे. राहुल गांधी हे वायनाडमधून तब्बल 65 हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे कॉंग्रेस पक्षामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. राहुल गांधी यांच्यासह नरेंद्र मोदी व अमित शाह हे हजारोंच्या मतांनी आघाडीवर आहेत.