Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajyasabha Live : “राजकारणामध्ये कधीही फुलस्टॉप नसतो…; राज्यसभेमध्ये PM मोदींचे सूचक वक्तव्य चर्चेत

PM Modi in Rajyasabha : कार्यकाळ संपत असलेल्या राज्यसभा सदस्यांसाठीच्या आभारप्रदर्शनावेळी पंतप्रधान मोदींनी राज्यसभेमध्ये भाषण केले. यावेळी त्यांनी विरोधी बाकांवरील जेष्ठ खासदारांचे कौतुक केले.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 18, 2026 | 01:25 PM
PM Narendra Modi Speech in Rajya Sabha at the Farewell Ceremony for MP delhi news

PM Narendra Modi Speech in Rajya Sabha at the Farewell Ceremony for MP delhi news

Follow Us
Close
Follow Us:
  • 37 राज्यसभा खासदारांचा निरोप समारंभ
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले राज्यसभेला संबोधित
  • राजकारणाला कधीही फुलस्टॉप नसतो – PM Modi
PM Modi in Rajyasabha : नवी दिल्ली : सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसऱ्या टप्प्याचे कामकाज सुरु आहे. संसदेमध्ये अनेक मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांनी खडाजंगी सुरु आहे. दरम्यान, राज्यसभेच्या निवडणूका (Rajysabha Election 2026)  देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यसभेतील 30 हून अधिक 37 खासदारांचा कार्यकाळ संपला आहे. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) राज्यसभेत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी राज्यसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि जेष्ठ नेते शरद पवारांचे कौतुक केले.

कार्यकाळ संपत असलेल्या राज्यसभा सदस्यांसाठीच्या आभारप्रदर्शनावेळी पंतप्रधान मोदींनी भाषण केले, यावेळी काँग्रेस अध्यक्ष खर्गे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा उल्लेख करत ते म्हणाले, “मी त्यांच्या योगदानाचे कौतुक करतो. इतका प्रदीर्घ कार्यकाळ ही काही साधी गोष्ट नाही.” त्याचप्रमाणे, उपसभापती हरिवंश हे देखील रजेवर जात आहेत. राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांनी सभापतींना माहिती दिली की, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि उपसभापती हरिवंश यांच्यासह २५ राज्यांतील ५९ सदस्य आपला कार्यकाळ पूर्ण करत आहेत.”

हे देखील वाचा : इतिहास घडला! LGBTQ+ समुदायाला संसदेत प्रतिनिधित्व; जाणून घ्या कोण आहेत मेनका गुरुस्वामी?

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, “देवेगौडा, मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार हे असे ज्येष्ठ नेते आहेत ज्यांनी आपले अर्धे आयुष्य संसदीय कामात घालवले आहे. समाजात आपल्याला दिलेल्या जबाबदाऱ्यांप्रति कसे समर्पित राहावे, हे आपण त्यांच्याकडून शिकले पाहिजे. राज्यसभेमध्ये नव्याने येणाऱ्या सदस्यांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. अनुभवी सदस्यांकडून नवीन राज्यसभा खासदारांनी शिकले पाहिजे,” असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

Speaking in the Rajya Sabha. https://t.co/TV2X34E4D1 — Narendra Modi (@narendramodi) March 18, 2026

राजकारणामध्ये कधीही फुलस्टॉप नसतो 

पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “राजकारणात पूर्णविराम नसतो. प्रत्येक खासदाराचे सभागृहासाठी काही ना काही योगदान असते. यातील अनेक सदस्य सभागृहात परत येतील. सर्व निवृत्त होणाऱ्या खासदारांनी उत्कृष्ट योगदान दिले आहे. जे जात आहेत पण परत येत नाहीत, त्यांनाही मी सांगू इच्छितो की, भविष्य तुमची वाट पाहत आहे आणि तुमचा अनुभव व योगदान राष्ट्राच्या जीवनात कायम राहील.सभागृहात अनेक विषयांवर चर्चा होते आणि काही कटू-गोड अनुभवही येतात. मात्र, जेव्हा असा प्रसंग उद्भवतो, तेव्हा साहजिकच, पक्षीय मतभेद विसरून आपल्या सर्वांच्या मनात एक समान भावना निर्माण होते: की हे सहकारी आता काही दुसऱ्या विशेष कामासाठी पुढे जात आहेत,” अशा भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या.

हे देखील वाचा : ओडिशा काँग्रेसमध्ये बंडाचा झटका! राज्यसभा निवडणुकीत क्रॉस-व्होटिंग करणाऱ्या ३ आमदारांचे निलंबन

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, “कुठून सुरुवात करावी हेच मला कळत नाही. केवळ निरोपाच्या उल्लेखानेच माझे डोळे भरून येतात. राजकारणातील लोक कधीही निवृत्त होत नाहीत, कधीही थकत नाहीत. प्रत्येकजण पूर्णपणे ज्ञानी नसतो. ५४ वर्षांच्या संसदीय कारकिर्दीनंतरही मला अजून शिकायचे आहे. या सभागृहात मला अनेक सुखद आणि दुःखद अनुभव आले आहेत. जे आता जात आहेत, त्यापैकी बरेच जण परत येतील.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Pm narendra modi speech in rajya sabha at the farewell ceremony for mp delhi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • Mallikarjun Kharge
  • narendra modi
  • Rajyasabha Election

संबंधित बातम्या

Middle East War : आता फक्त भारतच जगाला वाचवू शकतो? युद्ध थांबवण्यासाठी फिनलँडची PM मोदींकडे धाव
1

Middle East War : आता फक्त भारतच जगाला वाचवू शकतो? युद्ध थांबवण्यासाठी फिनलँडची PM मोदींकडे धाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.