हायकोर्टात सुनावणीदरम्यानच अचानक सुरू झाला पॉर्न व्हिडिओ अन् मग…

कर्नाटक हायकोर्टामध्ये (Karnataka High Court) एका खटल्याची सुनावणी सुरू असताना अचानक पॉर्न व्हिडिओ (Porn Video) सुरू झाल्याने खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, काही कुरापतखोरांनी झूम मिटिंग प्लॅटफॉर्मवर लॉग-इन केलं आणि कोर्टात सुनावणी सुरू असताना आक्षेपार्ह व्हिडिओ सुरू केले.

    नवी दिल्ली : कर्नाटक हायकोर्टामध्ये (Karnataka High Court) एका खटल्याची सुनावणी सुरू असताना अचानक पॉर्न व्हिडिओ (Porn Video) सुरू झाल्याने खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, काही कुरापतखोरांनी झूम मिटिंग प्लॅटफॉर्मवर लॉग-इन केलं आणि कोर्टात सुनावणी सुरू असताना आक्षेपार्ह व्हिडिओ सुरू केले.

    या प्रकारानंतर संतप्त झालेल्या हायकोर्ट प्रशासनाने सायबर सुरक्षेचे मुद्दे आणि एका अभूतपूर्व स्थितीचा हवाला देऊन आपल्या बंगळुरू, धारवाड आणि कलबुर्गी येथील खंडपीठांमधील लाईव्ह प्रक्षेपण आणि व्हिडिओ कॉन्फरसिंगची सुविधा अचानक निलंबित केली. या प्रकरणी हायकोर्टाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

    हायकोर्टाच्या कॉम्प्युटर विंगच्या रजिस्ट्रारने या प्रकरणी सायबर क्राइम पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच बंगळुरूच्या सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे. न्यायालयीन आदेशांमध्ये सांगण्यात आले की, तांत्रिक दुरुपयोगामुळे सध्या लाईव्ह स्ट्रिमिंग आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या सुविधांना परवानगी देण्यात आलेली नाही. नव्या सुरक्षा उपायांसह व्हिडिओ कॉन्फरन्स कारवाई पुन्हा सुरू होईपर्यंत सर्व संबंधित पक्षकारांना प्रत्यक्ष कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.