(फोटो सौजन्य: Pinterest)
कलिंगड खरेदी करुनही जर त्याची चव गोड लागत नसेल तर त्याला खाण्याची मजा येत नाही. अशावेळी आपले पैसेही वाया जातात. आज आम्ही तुम्हाला या लेखात कलिंगड खरेदी करताना कोणत्या टिप्स लक्षात ठेवाव्यात किंवा कलिंगड खरेदी करताना तो गोड आहे की नाही हे तपासण्यासाठी काय करावे याची माहिती सांगणार आहोत. या टिप्स तुम्ही खरेदी करत असलेला कलिंगड गोड आहे की नाही हे तपासण्यासाठी तुमची मदत करेल.
कलिंगडाला थोपटा
जेव्हा तुम्ही कलिंगड खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा त्यावर थाप मारा. जर कलिंगडातून पोकळ किंवा गुणगुणल्यासारखा आवाज येत असेल तर समजून जा की कलिंगड गोड आणि पिकलेला आहे. जर आवाज फार जड येत असेल तर कलिंगड कच्चे असण्याची शक्यता आहे.
कलिंगडाचे वजन तपासा
कलिंगड खरेदी करताना एकाच आकाराची दोन कलिंगडे उचला आणि त्यांचे वजन तपासा. जर कलिंगड जड वाटत असेल तर त्यात पाणी आणि गोडव्याचे प्रमाण अधिक आहे.
कलिंगडावरील पिवळा भाग काय सांगतो?
आपण कलिंगड खरेदी करताना यावर पिवळा डाग पाहिला असेल. अधिकतरवेळी कलिंगडाच्या खालच्या बाजूला हा डाग दिसून येतो. खालच्या बाजूला असलेला हा पिवळा भाग जमिनीत पिकत असताना कलिंगडाची स्थिती कशी होती ते दर्शवतो. रंग जेवढा जास्त पिवळा तेवढे कलिंगड गोड असते. जर रंग पांढरा किंवा फिकट पिवळ असेल तर फळ कच्चे असू शकते.
कोणत्या चूका टाळाव्यात?
कलिंगड खरेदी करण्यापूर्वी त्याचे देठ तपासा. जर देठ सुकलेले किंवा तपकिरी असेल तर कलिंगड चांगला पिकलेला असल्याची शक्यता आहे. पण जर देठ हिरवे असेल तर कलिंगड कच्चे असू शकते. जास्त चमकदार कलिंगड बहुतेकदा कच्चे असते, तर निस्तेज साल असलेले कलिंगड गोड असते.






