वसईमध्ये बद्रीनाथ मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त धार्मिक वातावरणाची अनुभूती मिळाली. उत्तरांचल मित्र मंडळ, वसई यांच्या वतीने आयोजित भव्य कलश यात्रेला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. स्वामीनारायण मंदिरापासून सुरू झालेली ही यात्रा सन सिटी परिसरातील मंदिरात जल्लोषात पोहोचली. पारंपरिक वेशभूषेत महिलांनी डोक्यावर कलश घेऊन सहभाग नोंदवला, तर ढोल-ताशांच्या गजरात “जय बद्री विशाल”च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला. सुमारे 35 वर्षांच्या प्रयत्नांनंतर उभारण्यात आलेले हे मंदिर श्रद्धा, एकता आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक ठरत असून, या सोहळ्याने समाजात एकात्मतेचा संदेश दिला.