(फोटो सौजन्य: istock)
ज्यांना फिरण्याची आणि नवनवीन ठिकाणं पाहण्याची आवड असते त्यांना परदेशात जाणं नेहमीच रोमांचक वाटतं. पण इंटरनॅशनल ट्रिप प्लॅन करताना सर्वात मोठा प्रश्न बजेटचाच असतो. जर तुमच्याकडे साधारण ₹५०,००० चा बजेट असेल, तरीसुद्धा तुम्ही काही सुंदर आणि किफायतशीर देशांमध्ये प्रवासाचा आनंद घेऊ शकता. आज आम्ही तुमच्यासाठी काही अशा देशांची यादी घेऊन आलो आहोत ज्यांना तुम्ही कमी बजेटमध्ये भेट देऊ शकता. तुमचे परदेशी जाण्याचे स्वप्न आता कमी बजेटमध्येच पूर्ण होऊ शकते. चला सविस्तर जाणून घेऊया.
भारत ते नेपाळ प्रवास
भारताच्या शेजारी असलेला आणि भारतीय प्रवाशांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेला देश म्हणजे नेपाळ. येथे निसर्गसौंदर्य, अध्यात्म आणि संस्कृती यांचा अप्रतिम संगम पाहायला मिळतो. भारतीय नागरिकांना येथे जाण्यासाठी व्हिसाची गरज नसते. सुमारे ₹२५,००० मध्ये तुम्ही ३-४ दिवसांची नेपाळ ट्रिप करू शकता.
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा सफर किती महाग असणार? कुठे कुठे थांबणार? जाणून घ्या संपूर्ण तपशील
काठमांडू मध्ये पशुपतिनाथ मंदिर, स्वयंभूनाथ, दरबार स्क्वेअर आणि बौद्धनाथ स्तूप पाहण्यासारखे आहेत. पोखरा येथे फेवा लेक, पीस पगोडा आणि सरंगकोट विशेष आकर्षण आहे. भगवान बुद्धाचा जन्मस्थळ लुंबिनी येथे माया देवी मंदिर आणि विविध देशांचे बौद्ध मठ आहेत. तसेच नागरकोट, भक्तपूर आणि पाटन हेही भेट देण्यासारखे आहेत.
अनुमानित खर्च:
भारत ते व्हिएतनाम प्रवास
प्राकृतिक सौंदर्य, समृद्ध इतिहास, स्वच्छ समुद्रकिनारे आणि स्वादिष्ट स्ट्रीट फूड यासाठी व्हिएतनाम प्रसिद्ध आहे. भारतीय पर्यटकांना ऑनलाईन ई-व्हिसा (https://evisa.xuatnhapcanh.gov.vn) सहज मिळतो. ₹५०,००० च्या आत एक सुंदर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी व्हिएतनाम उत्तम पर्याय ठरू शकतो.
हनोई मध्ये होन कीम लेक, ओल्ड क्वार्टर आणि हो ची मिन्ह समाधी पाहायला मिळते. डा नांग हे समुद्रकिनारे आणि गोल्डन ब्रिजसाठी प्रसिद्ध आहे. हलॉंग बे हे UNESCO जागतिक वारसा स्थळ आहे. हो ची मिन्ह सिटी मध्ये वॉर रेमनंट्स म्युझियम, बेन थान मार्केट, तर होई अन आपल्या रंगीबेरंगी लँटर्नसाठी लोकप्रिय आहे.
अनुमानित खर्च (५-६ दिवस):
भारत ते श्रीलंका प्रवास
सुंदर डोंगररांगा, प्राचीन मंदिरे, शांत समुद्रकिनारे आणि समृद्ध वन्यजीव यासाठी श्रीलंका ओळखली जाते. भारतातून केवळ १.५ ते २.५ तासांच्या फ्लाइटने येथे पोहोचता येते. भारतीय पासपोर्टधारकांना ई-व्हिसा सहज मिळतो. कोलंबो मध्ये गंगारामाया मंदिर, गाले फेस ग्रीन आणि स्थानिक बाजार फिरू शकता. कँडी येथे टूथ मंदिर, कँडी लेक आणि सांस्कृतिक शो खास आहेत. नुवारा एलिया येथे चहाच्या बागा, तलाव आणि ट्रेन प्रवास अप्रतिम अनुभव देतो. बेंटोटा, मिरिस्सा आणि गाले हेही पाहण्यासारखे समुद्रकिनारे आहेत.
अनुमानित खर्च (५-६ दिवस):
या देशांशिवाय आणखीन कोणत्या देशांना कमी बजेटमध्ये भेट देता येईल?
भूतान, इंडोनेशिया
आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
पासपोर्ट, व्हिसा, प्रवासाचे तिकिट, आरोग्य विमा