नवी दिल्ली : आज राहुल गांधी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत पंतप्रधानांच्या संसदेतील भाषणावर सडकून टीका केली. त्यांना त्यांच्या पदाचे गांभीर्य नसल्याने ते अत्यंत चुकीचे वर्तन काल संसदेत करीत होते. त्यांनी 2 तास 18 मिनिटांच्या भाषणात एक शब्द मणिपूरवर काढला नाही. विरोधी पक्ष वैतागून निघून गेल्यावर बोलताहेत.
मणिपूरमध्ये भयंकर हिंसाचार हा मुख्य विषय सोडून
मणिपूरमध्ये भयंकर हिंसाचार चालू आहे. मी संसदेत हा विषय मांडला. संसदेत आमचा विषय मणिपूर होता. हा विषय सोडून पंतप्रधान संसदेत हास्यजत्रा करताहेत. आमच्यावर कॉंग्रेसवर, विरोधीपक्षांचे विषय काढताहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे.
पंतप्रधान संसदेत चेष्टा-मस्करी करतात
प्रश्न हा नाही की, ते 2024 ला पंतप्रधान होणार, प्रश्न हा आहे की, मणिपूर जळतेय तेथे मलम लावायचे सोडून संसदेत चेष्टा-मस्करी करताहेत. आमच्यावर चुटकुले सुनावत आहेत, हे कसले वर्तन असा गंभीर सवालदेखील राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
मणिपूरमधील अनुभव सांगितला
मणिपूरमध्ये दौरा करीत असताना, मला एवढे वाईट वाटले, मैतेयींच्या शिबिरामध्ये जायचे असताना एकही कुकी समाजाचा माणूस तुमच्याबरोबर नको आहे. आम्ही त्यांना गोळी घालू. तर दुसरीकडे कुकींकडे जाताना मैतेयी समाजाचा एकही मनुष्य माझ्याबरोबर नव्हता नाहीतर त्याची हत्या झाली असती. एक राज्य पूर्णपणे 2 भागांमध्ये चिरफाड झाली आहे.