AI स्पर्धेत Google आघाडीवर! AI मॉडेल Gemini 3.1 Pro ठरणार गेमचेंजर, चुटकीसरशी मिळणार यूजर्सच्या प्रश्नांची उत्तरं...
जेमिनी 3 सीरीजवर आधारित, 3.1 प्रो कोअर रीजनिंगमध्ये एक पाऊल पुढे आहे. 3.1 प्रो हे ज्यादा कॅपेबल आणि गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यास अधिक सक्षम आहे. गूगलचे असं म्हणणं आहे की, हे बेंचमार्क प्रगतीमध्ये देखील दिसून येते. ARC-AGI-2 बेंचमार्क जे एआय मॉडेलच्या क्षमतेची जटिल लॉजिक पॅटर्न सोडवण्याची चाचणी घेतो. या बेंचमार्कवर जेमिनी 3.1 Pro ने 77.1% स्कोर प्राप्त तेसा आहे, जो जेमिनी 3 Pro च्या स्कोअरपेक्षा दुप्पट आहे. हे मॉडेल त्याच्या अॅडव्हांस रिजनिंगचा वापर करून कठीण टास्क पूर्ण करू शकणार आहे. (फोटो सौजन्य – X)
Gemini 3.1 Pro be like pic.twitter.com/ZwCauGxLar — Google (@Google) February 19, 2026
Gemini 3.1 Pro is here: A smarter model for your most complex tasks. Building on the Gemini 3 series, 3.1 Pro is a step forward in reasoning. It’s designed for tasks where a simple answer isn’t enough, taking advanced reasoning and making it useful for your hardest challenges.🧵 — Google Gemini (@GeminiApp) February 19, 2026
जेमिनी 3.1 प्रो गूगलचे पहिला ‘.1’ अपडेट आहे. यापूर्वी गुगलने ‘.5’ अपडेट सादर केले आहे. याचा अर्थ असा आहे की, यावेळी कंपनीने नवीन फीचर्सवर भर देण्याऐवजी एआय मॉडेल जास्त समजूतदार आणि विचार करणाऱ्या स्वरुपात सादर केले आहे. यामध्ये गुगलचे नवीन डीप थिंक रीजनिंग इंजिन जोडण्यात आले आहे. याच्या मदतीने आता एआय पूर्वीपेक्षा जास्त खोल विचार करू शकणार आहे आणि योग्य उत्तरं देऊ शकणार आहे. गूगलनुसार, हे मॉडेल अशा कामांसाठी तयार करण्यात आले आहे, जिथे केवळ सामान्य उत्तर फायदेशीर ठरत नाहीत.
जेमिनी 3.1 Pro चे प्रीव्यू लाँच करण्यात आले आहे. तसेच कंपनी याच्या एजेंटिक वर्कप्लोची तपासणी करत आहे. यूजर्स याचा वापर जेमिनी अॅप आणि नोटबुक एलएममध्ये करू शकणार आहेत. गुगल एआय प्रो आणि अल्ट्रा सब्सक्राइबर्स एका मर्यादेपुरता याचा वापर करू शकणार आहेत. डेव्हलपर्स गुगल AI स्टुडिओ, जेमिनी सीएलआय, अँटीग्रॅव्हिटी, व्हर्टेक्स एआय, जेमिनी एंटरप्राइझ आणि अँड्रॉइड स्टुडिओ मध्ये जेमिनी API वापरू शकतात. सामान्य यूजर्सना लवकरच गुगल जेमिनी 3.1 Pro चा अॅक्सेस मिळू शकेल.






