केदारनाथ : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi In Kedarnath )तीन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर आहेत. राहुल गांधींनी केदारनाथ धामला भेट दिली. यावेळी राहुलनेही आरतीमध्ये सहभाग घेतला. तिथून एक व्हिडिओही समोर आला आहे ज्यामध्ये राहुल गांधी मंदिर परिसरात प्रसाद वाटप करताना दिसत आहेत.
[read_also content=”रश्मिका मंदनाचा फेक व्हिडिओ व्हायरल, अमिताभ बच्चन संतापले, कडक कारवाईची केली मागणी! https://www.navarashtra.com/movies/ai-deepfake-video-of-actress-rashmika-mandana-going-viral-amitabh-bachchan-raises-concern-nrps-478006.html”]
काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘x’ वर आपल्या अधिकृत अकाऊंटवर यात्रेचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये वायनाडचे खासदार राहुल गांधी आरतीमध्ये सहभागी होताना, केदारनाथ मंदिरात भक्तांना चहा देताना आणि मंदिर परिसरात भाविकांना प्रसाद वाटताना दिसले.
#WATCH उत्तराखंड: कांग्रेस सांसद राहुल गांधी ने केदारनाथ मंदिर परिसर में प्रसाद बांटा। pic.twitter.com/OcSWQ8d1XX
— ANI_HindiNews (@AHindinews) November 6, 2023