स्वामी स्मरणानंद महाराज यांचं वयाच्या ९५ व्या वर्षी निधन, ममता बॅनर्जींसह पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक!

रामकृष्ण मठ आणि मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद महाराज यांचे मंगळवारी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. ते अनेक दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होते.

  रामकृष्ण मठ आणि मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद महाराज (ramakrishna missionchief swami smaranananda maharaj) यांचे मंगळवारी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. ते अनेक दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होते. 29 जानेवारीपासून त्यांच्यावर  रुग्णालयात उपचार सुरूहोते. मात्र, उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांना सेप्टिसीमिया झाला आणि ३ मार्च रोजी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तसेच त्यांना किडनीचाही त्रास असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक

  स्वामी स्मरणानंद महाराज यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून शोक व्यक्त करताना म्हटले आहे की, रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे पूज्य अध्यक्ष स्वामी स्मरणानंद जी महाराज यांनी आपले जीवन अध्यात्म आणि सेवेसाठी समर्पित केले. असंख्य हृदयांवर आणि मनावर त्यांनी अमिट छाप सोडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माझे त्याच्याशी खूप घट्ट नाते आहे. मला 2020 मध्ये माझी बेलूर मठाची भेट आठवते, जेव्हा मी त्यांच्याशी संवाद साधला होता. काही आठवड्यांपूर्वी मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी कोलकाता येथील रुग्णालयातही गेलो होतो. बेलूर मठातील असंख्य भक्तांसोबत माझ्या संवेदना आहेत. ओम शांती.

  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी व्यक्त केला शोक

  नुकत्याच पश्चिम बंगालच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी स्वामी स्मरणानंद महाराज यांची रुग्णालयात भेट घेतली होती. याशिवाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही त्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात गेल्या होत्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही स्वामी स्मरानंद महाराज यांच्या निधनाबद्दल इंस्टाग्रामवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, आज रात्री रामकृष्ण मठ आणि मिशनचे आदरणी य अध्यक्ष स्वामी स्मरणानंद जी महाराज यांच्या निधनाच्या वृत्ताने मला खूप दुःख झाले आहे.

  या महान भिक्षूने आपल्या हयातीत रामकृष्णवाद्यांच्या जागतिक व्यवस्थेला आध्यात्मिक नेतृत्व दिले आहे आणि जगभरातील कोट्यवधी भक्तांसाठी ते समाधानाचे स्रोत आहेत. मी त्यांच्या सर्व सहकारी भिक्षू, अनुयायी आणि भक्तांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करते.

  स्वामी स्मरणानंद हे रामकृष्ण मठ आणि मिशनचे 16 वे अध्यक्ष

  स्वामी स्मरणानंद यांचा जन्म 1929 मध्ये तमिळनाडूच्या तंजावर येथे झाला आणि ते 1952 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी रामकृष्ण मिशनमध्ये सामील झाले. स्वामी आत्मस्थानंद यांच्या निधनानंतर स्वामी स्मरणानंद महाराज रामकृष्ण मठ आणि मिशनचे 16 वे अध्यक्ष बनले.